Dalgona Coffee: लॉकडाऊनच्या काळात सोशल मिडिया का व्हायरल होत आहे दलगोना कॉफी? पाहा याची झटपट रेसिपी
घरच्या घरी ही कॉफी बनवून लोक त्याची रेसिपीज, त्याचे फोटोज सोशल मिडिया आणि व्हॉट्सअॅप स्टेटसवर अपलो़ड करताना दिसत आहे.
कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन ठेवण्यात आले आहे. अशा स्थितीत लोकांनी घराबाहेर न पाडता आपल्या कुटूंबासोबत छान वेळ घालवा असा सल्ला नागरिकांना देण्यात येण्यात आहे. मात्र 21 दिवसांच्या या लॉकडाऊनमध्ये नेमकं काय करावे हेच लोकांना सुचत नाहीय. यात अनेक जण आपला छंद जोपासताना दिसतायत कुणी गाताना, कुणी नाचताना, व्यायाम करताना, तर कुणी छान चमचमीत रेसिपीज बनवताना दिसत आहे. सोशल डिस्टंसिंगमुळे घराबाहेर जाणे बंद झाल्याकारणाने खवय्यांचे धाबे चांगलेच दणाणलेत. यात चहा, कॉफीची आवड असणारे घरच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीच्या चहा, कॉफी बनवत आहेत. यात सध्या सोशल मिडियावर Dalgona Coffee प्रचंड व्हायरल होत आहे.
घरच्या घरी कॅफे कॉफी शॉपप्रमाणे अनुभव देणारी ही कोल्ड कॉफी सध्या नेटक-यांमध्ये प्रचंड व्हायरल होत आहे. घरच्या घरी ही कॉफी बनवून लोक त्याची रेसिपीज, त्याचे फोटोज सोशल मिडिया आणि व्हॉट्सअॅप स्टेटसवर अपलो़ड करताना दिसत आहे. ही आहे ग्रीन टी पिण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ, जाणून घ्या सविस्तर
Dalgona Coffee व्हायरल होण्याचे कारण काय?
1. कॉफी प्रेमी जी बाहेरील कॉफी शॉप मधील कॉफी मिस करत आहेत यामुळे
2. लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टंसिंग शी जोडले जावे याकरिता लोक घरच्या घरी ही कॉफी बनवत आहे.
3. हे बनविण्याकरिता लागणारे साहित्य हे घरात उपलब्ध आहेत.
4. टिकटॉक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर ही प्रचंड व्हायरल झाली आहे.
पाहा रेसिपी:
ही कॉफी मूळ साउथ कोरियाची आहे. कोरियन भाषेत दलगोना या शब्दाचा अर्थ Ppopgi म्हणजेच Honeycomb कॉफी असतो. ही कॉफी मॅकडोनाल्ड पेक्षा आधी साउथ कोरियामध्ये प्रसिद्ध आहे. ही कॉफी फायदे असे काही नाही मात्र ज्यांना कोल्ड आणि स्ट्राँग कॉफी आवडते त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. शिवाय अशा कॉफी प्रेमींना याचे फोटो पाहूनच तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही.