मुंबई: स्वाती स्नॅक्स चा वडापाव जगातील बेस्ट बर्गर च्या टॉप 5 यादीत; वाचा सविस्तर

मुंबईची शान म्ह्णून ओळखला जाणाऱ्या वडापाव (Vadapav) ने आता जगातील बेस्ट बर्गरच्या टॉप 5 (Top 5 Best Burger) यादीत स्थान मिळवले आहे, Michelin Star प्राप्त काही शेफ ना अलीकडेच आपण आजवर जगात कोणत्या ठिकाणी सर्वात बेस्ट बर्गर खाल्ला याबाबत Bloomberg कडून विचारणा केली असता अनेकांनी मुंबईतील वडापावचे नाव घेतले आहे

World Vada Pav Day 2019 (Photo Credits: FIle Image)

मुंबईची शान म्ह्णून ओळखला जाणाऱ्या वडापाव (Vadapav) ने आता जगातील बेस्ट बर्गरच्या टॉप 5 (Top 5 Best Burger) यादीत स्थान मिळवले आहे, Michelin Star प्राप्त काही शेफ ना अलीकडेच आपण आजवर जगात कोणत्या ठिकाणी सर्वात बेस्ट बर्गर खाल्ला याबाबत Bloomberg  कडून विचारणा केली असता अनेकांनी मुंबईतील वडापावचे नाव घेतले आहे. यातही विशेष म्हणजे मुंबईतील स्वाती स्नॅक्स (Swati Snacks Vadapav) या जॉईन्टचा त्यांनी अगदी नावासहित उल्लेख केला आहे. बर्गर हा साधारणतः बनच्या मधोमध ठेवलेली मीट पॅटी आणि त्यावर वेगवेगळे सॉस, भाज्या इत्यादी अशा रूपात खाल्ला जाणारा एक सोप्पा पदार्थ आहे. याच ढंगाचा भारतीय अविष्कार म्हणजे वडापाव. यामध्ये केवळ पावाच्या मध्ये मटणाच्या ऐवजी उकडलेल्या बटाट्याचे वडे घालून सॉसच्या ऐवजी चटणी लावून सर्व्ह केले जाते.

प्राप्त माहितीनुसार, जिकोनी हॉटेल येथील शेफ रविंदर भोगल आणि मुंबईतील शेफ प्रतीक संधू यांनी स्वाती स्नॅक्सच्या वडापावची खास कौतुक करत चवीसाठी फुल्ल मार्क्स दिले आहेत. हा वडापाव त्याला लागलेली चटणी आणि सोबत मिळणारी हिरवी तळलेली मिरची हे कॉम्बिनेशन हलक्या हृदयाच्या व्यक्तींसाठी नाही असेही ते म्हणाले. डोंबिवली: 'उत्सव' सोहळ्यात एकाच दिवशी 25 हजार बटाटेवडे तळून शेफ सत्येंद्र जोग घडवणार अनोखा विक्रम; काय आहे हा उपक्रम जाणून घ्या

हा पर्याय बर्गरच्या तुलनेत स्वस्त असल्याने आणि सोबतच शाकाहारी असल्याने मुंबईत तर अनेकांची आवडती डिश म्हणून पहिला जातो, मात्र आता केवळ मुंबई किंवा देशातच नव्हे तर जगातील बेस्ट बर्गर्समध्ये या पदार्थाला स्थान मिळणे ही खरोखरच मानाची गोष्ट मानली जातेय,अगदी मोठमोठ्या सेलिब्रिटींपासून ते सामान्य नोकरदारापर्यंत प्रत्येक जण या वडापावला आपला फेव्हरेट मानतो, कोणाच्याही स्ट्रगलिंग स्टोरी सांगायच्या असतील तर वडापाव खाऊन दिवस काढलेले हे वाक्य ऐकायला मिळते, त्यामुळे गरिबी श्रीमंती असा कोणताही भेद हा वडापाव करत नाही हे सिद्ध होते, आणि राहिला प्रश्न चवीचा तर आता स्वतः मानांकित शेफने वडापावला फुल्ल मार्क दिल्यावर सवालच उरत नाही? बरोबर ना?