Shravan Special Recipes: अळूवडी ते अळूच्या पानाच्या भजी पर्यंत 'या' श्रावण महिना विशेष लज्जतदार रेसिपी नक्की ट्राय करुन पाहा (Watch Video)
अशावेळी ब-याचदा सर्वांना आवडणा-या अळूवडीचा बेत ठरतो. पण त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही हटके गोष्टी ट्राय करायच्या असतील तर पुढे दिलेल्या रेसिपीज तुम्ही करुन पाहू शकता.
श्रावण मास (Shravan Mass) म्हटला की घरी गोडाधोडाचे, शुद्ध शाकाहारी पदार्थांचे घरी छान बेत रंगतात. अन्य भाज्यांसह रानभाज्याही मिळतात. विशेषत: रानभाज्या ह्या विशेष करुन पावसाळ्यात जास्त पाहायला मिळतात. त्यामुळे या भाज्यांचा छान आस्वाद घेतात. यात एक नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे अळूची पाने (Taro Leaf). अळूच्या पानांपासून बनवलेल्या अळूवड्या ह्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. पण तुम्हाला माहिती आहे औषधी गुणधर्म असलेल्या या अळूच्या पानांपासून न केवळ अळूवडी बनवता येते तर आणखी खमंग, चटकदार चवदार अशा रेसिपीज बनविता येतात.
श्रावणात काय करू आणि काय नको अशी अवस्था अनेक गृहिणींची होते. अशावेळी ब-याचदा सर्वांना आवडणा-या अळूवडीचा बेत ठरतो. पण त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही हटके गोष्टी ट्राय करायच्या असतील तर पुढे दिलेल्या रेसिपीज तुम्ही करुन पाहू शकता.
अळूवडी
अळू भजी
हेदेखील वाचा- Health Tips: अळूची पाने खाणे आरोग्यासाठी आहेत खूपच गुणकारी; जाणून घ्या सविस्तर
अळूचं फतफतं
अळूच्या पानांची भजी
अळूच्या गाठींची भाजी
अळूची पाने खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात आणता येते. त्याचबरोबर पोटाचे विकार, सांधेदुखी यांसारखे आजारही बरे होण्यास मदत होते. त्यामुळे अळूची पाने खाताना जर तुमची नाकं मुरडत असतील तर तुम्ही वरील रेसिपीज ट्राय करुन त्यावर ताव मारू शकता.