Omelette With Parle G: ऑमलेट आणि पार्ले बिस्कटीचं कॉम्बिनेशन, रेसिपी पाहून युजर्सचा संपात (Viral Video)
ऑमलेट बनवून विकणाऱ्या या व्यक्तीने चक्क अनोखा प्रयोग केला आहे.
Viral Video: सोशल मीडियावर स्ट्रिट फुडचे असंख्य व्हिडिओज व्हायरल होत असताता. भारताची खाद्य संस्कृती ही साधी सोपी असल्याने प्रसिध्द तर आहे परंतु बदल्या तंत्रज्ञानामुळे याचे चित्र फारसे बदलत चालले आहे. भारतीय फुड, स्ट्रिड फुड आणि स्कॅक्स बनवण्यासाठी आगळा वेगळा प्रयोग तर केला जातोच. या प्रयोगात अनेक डिशेस या फेल होतात नाही तर बऱ्यापैकी ट्रेंडी होतात. दरम्यान मॅगीमध्ये कोकाकोला ड्रिंक्स टाकून बनवलेला डिश. तर कधी पाणीपूरीमध्ये मॅगी सर्व्ह केली जाते असे असंख्य प्रयोग होत असतात. (हेही वाचा-येत्या 20 ते 28 जानेवारी दरम्यान ‘मुंबई फेस्टिव्हल 2024’ चे आयोजन; )
काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका स्ट्रिड फुड बनवणाऱ्याने हद्दच पार केली. ऑमलेट बनवून विकणाऱ्या या व्यक्तीने चक्क अनोखा प्रयोग केला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, तो व्यक्ती रीतसर ऑमलेट बनवतो, अंडे फोडून कांदा, टोमॅटो,मिरची अश्या पदार्थ मिक्स करून रितसर ऑमलेट बनवण्यासाठी पॅनमध्ये हे मिश्रण टाकले. थोड्याच वेळाने तो पार्लेजी चे बिस्किट त्या ऑमलेटवर ठेवतो. एक बिस्किट नाही तर संपुर्ण पॅकेट या ऑमलेटवर ठेवतो. हा व्हिडिओ एका @foodb_unk या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलाय.
त्यानंतर त्याने मोये मोये ऑमलेट असं या खाद्यपदार्थाला नाव दिले आहे. हा व्हिडिओ पाहून नॉनव्हेज प्रेमी यांनी संपात व्यक्त तर केलाच आहे. हे असे पदार्थ कुत्रं सुध्दा खाणार नाही असं एका युजर्सनी लिहले आहे. ऑमलेट आणि पार्लेची ही रेसीपी पाहून काहींनी हास्यस्पद कंमेट देखील केले आहे.