McDonald's मेन्यू कार्डमध्ये आला मसाला डोसा बर्गर; नेटक-यांनी ट्विटरवर दिल्या संमिश्र प्रतिक्रिया

या आधुनिक बर्गरचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी आले असेल

Masala Dosa Burger (Photo Credits: Twitter)

जगातील तमाम लोकांच्या जिभेचे चोचले पुरविणारी प्रसिद्ध फास्ट फूड कंपनी मॅकडोनाल्ड (McDonald's) ने आपल्या मेन्यू कार्डमध्ये एका नवीन पदार्थाचा समावेश केला आहे. पाश्चात्य पदार्थाला भारतीय पदार्थाचा टच देऊन मसाला डोसा बर्गर हा नवीन पदार्थ खवय्यांसाठी आणला आहे. या आधुनिक बर्गरचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी आले असेल. या बर्गर आता मॅकडोनाल्डच्या आउटलेट्स मध्ये उपलब्ध होणार आहे. मॅकडोनाल्ड प्रेमींसाठी ही एक पर्वणी असून भारतीय पदार्थांची जोड असलेल्या या बर्गरचे विविध स्तरातून स्वागत केले जात आहे. मग यात नेटकरी देखील कसे मागे राहतील. नेटक-यांनी या मसाला डोसा बर्गर बाबतच्या प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

काय असेल या मसाला डोसा बर्गरचे वैशिष्ट्य:

हा बर्गर ग्रील्ड केलेल्या भाज्यांसोबत मसालेदार चटणींसह दिला जाईल. त्याचबरोबर यात थोडीशी सांबरची चव देखील असेल. यात रस्सम मध्ये मसालेदार, चटपटीत अशा सॉसची चव असेल. हा बर्गर तुम्हाला 59 रुपयांत मॅकडोनाल्डच्या आउटलेट्समध्ये उपलब्ध होईल. शिवाय कॉम्बो ऑफरमध्ये तुम्हाला कॉफी, थम्प्स अप आणि इतर कोल्ड ड्रिंक्स ठेवण्यात आले आहेत.

पाहा ट्विटरवर मसाला डोसा बर्गरविषयी प्रतिक्रिया:

हेदेखील वाचा- Dominos, KFC , MCDonalds मधून खाणे टाळल्यास डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया बळावणार; नरेंद्र मोदी यांच्या नावे व्हायरल होणाऱ्या या Whatsapp मेसेज मागील सत्य जाणून घ्या

या सोबत मॅकडोनाल्ड अनेक शाकाहारी आणि मांसाहारी नाश्ता ज्यात vegetarian breakfast options such as Veg McMuffin, Egg & Cheese McMuffin, Sausage McMuffin, Egg & Sausage McMuffin, Hot cakes, Hash brown यांसारखे पर्याय असतील.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif