How to Make Curd at Home: घरात विरजण नसताना कसं बनवाल घट्टसर दही? Watch Recipe
म्हणूनच घरी विरजणास दही नसतानाही घरच्या घरी घट्टसर दही कसे बनवावे याची सोप्पी पद्धत जाणून घेण्यासाठी हे व्हिडिओ अवश्य पाहा
दुधापासून (Milk) बनलेला एक पदार्थ जो अनेकदा आपल्या पदार्थांची चव वाढविण्यासाठी वापरला जातो तो म्हणजे दही (Curd). काही लोकांना दही नुसतं खाण्यासाठी, काहींना पदार्थांची चव वाढविण्यासाठी तर काहींना त्यापासून अनेक पदार्थ बनविण्यासाठी दह्याचा वापर करतात. मात्र त्यासाठी विकतचे दही आणणे अनेकांना परवडत नाही. तर काहींना घरचे विरजणाचे दहीच जास्त आवडते. मात्र कधीकधी घरी (Home) विरजणासाठी पुरेसे दही नसल्यास अडचण निर्माण होते. अशा वेळी काय करता येईल असा अनेक गृहिणींना प्रश्न पडलेला असतो. खाण्यासाठी नाही मिळाले तरी चालेल पण काही ठराविक पदार्थांसाठी दही असणे फार गरजेचे असते.
दह्याचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर असते. दुधाच्या तुलनेत दही लवकरच पचते. ज्या व्यक्तींचा पोटाचे विकार सतावतात जसे अपचन, बद्धकोष्ठता, गॅससारख्या समस्यांपासून दह्यामुळे सुटका मिळते. यात पाचनशक्ती सुधारणारे चांगले बॅक्टेरिया असतात. तसेच उच्च प्रतीचे प्रोटीनही असते. म्हणूनच घरी विरजणास दही नसतानाही घरच्या घरी घट्टसर दही कसे बनवावे याची सोप्पी पद्धत जाणून घेण्यासाठी हे व्हिडिओ अवश्य पाहा
दह्याचे सेवन दात आणि हांडांच्या आरोग्यासाठीही चांगले आहे. दह्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते ज्यामुळे दात आणि हाडे मजबूत होतात.
हेदेखील वाचा- दही भात खाण्याचे ५ आरोग्यदायी फायदे
या व्हिडिओमध्ये अगदी कमी साहित्यात तुम्हाला हवे तसे घट्ट दही तुम्हाला घरच्या घरी बनवता येईल. पण त्यासाठी काही ठराविक गोष्टींची काळजी घेणेही गरजेचे आहे. त्यामुळे या पद्धतीने घरगुती दही एकदा करून पाहाच.