Ganeshotsav 2019: उकडीचे ते Nutella बॉम्ब मोदक; बाप्पाच्या आवडीच्या मोदकांचे हटके व्हर्जन चाखण्यासाठी मुंबईतील या पाच ठिकाणांना नक्की द्या भेट!
यंदा नैवेद्याला उकडीचे मोदक ठेवल्यावर घरी येणाऱ्या पाहुण्यांना काय द्यायचे असा प्रश्न पडला असेल तर त्यावर मुंबईतील ही मोदकाची पाच नक्की तुमचं उत्तर आहेत. चॉकलेट ते कॅरॅमल मोदकांपासून 3D जेली मोदकांपर्यंत पर्याय देणाऱ्या या ठिकाणांना यंदा आवर्जून भेट द्या
मुंबईसह देशभरात येत्या 2 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2019) निमित्ताने उत्साहाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी लाडक्या बाप्पाच्या आगमसाठी भाविकांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. गणपतीसाठी हटके आरास, सजावट, पूजेची सामग्री इथपासून ते दहा दिवस बाप्पाला काय नैवैद्य दाखवायचा याचं सुद्धा घरोघरी प्लॅनिंग सुरु आहे. खरंतर सणउत्सव म्हणजे एखाद्या हौशी खवय्यासाठी पर्वणीच असते, आणि त्यातही गणपती येणार म्हंटल्यावर मोदकां (Modak) वर ताव मारणे हा जणू काही परंपरेचाच भाग बनून जातो. पूर्वी उकडीचा मऊशार, अगदी ओठाने तुटेल असा मोदक आणि त्यात खुसखुशीत भाजलेलं सारण आणि वरून तुपाची धार असा मोदकाचा थाट असायचा पण अलीकडे बाप्पाच्या आवडीच्या या मोदकांना एक हटके रूप देण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. (Ganesh Utsav 2019: मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळ लालबाग, चिंतामणी, गणेश गल्लीसह 'या' 5 ठिकाणी कसे जायचे? याची माहिती मिळवा)
जर का तुम्हाला देखील यंदा काहीतरी हटके ट्राय करायचे असेल तर तुम्ही मोदकांचे काही फ्युजन व्हर्जन नक्की ट्राय करू शकता, यासाठी मुंबईतील 'या' अस्सल पाच ठिकणांना नक्की भेट द्या..
मोदकम, दादर
प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराच्या शेजारी असणारे मोदकम हे जुने आणि प्रसिद्ध ठिकाण आहे मागील दहा वर्षांपासून येथे वेगवेगळ्या रूपात मोदक बनवले जातात. साधारण मोदकापेक्षा आकाराने मोठा असणारा एक मोदक खाल्ला तरी भूक आणि मन तृप्त होते.
पत्ता- 8/1,कामना हाऊसिंग सोसायटी, सिद्धिविनायक मंदिर जवळ, प्रभादेवी
पंजाबी घासीथराम वर्ल्ड ऑफ स्वीट्स, अंधेरी
अंधेरी येथील या वर्ल्ड ऑफ स्वीटस मध्ये तुम्हाला नेहमीच्या मावा मोदकांसोबतच सुक्या मेव्याचे मोदक, ब्राऊनी मोदक, चॉकलेट मोदक असे हटके पर्याय उपलब्ध आहेत. खास म्हणजे हे मोदक आपल्याला शुगर फ्री रूपात देखील मिळू शकतात. अलीकडेच त्यांनी फ्युजन मोदकांचा प्रयत्न म्हणून व्हॅनिला सॉस, ब्लूबेरी, वाईल्ड चेरी असे मोदक देखील विकायला सुरुवात केली आहे.
पत्ता- पंजाबी घासीथराम वर्ल्ड ऑफ स्वीट्स, जे पी मार्ग अंधेरी, पश्चिम
Vedge, अंधेरी
जर का तुम्ही पट्टीचे मोदक खाणारे असाल तर तुम्हाला अंधेरीतील वेज (Vedge) याठिकाणी मिळणारी मोदक थाळी एकदा चाखायलाच हवी. या मध्ये आपल्याला नारळ- गुळाचा मोदक, सफरचंद व दालचिनी फ्लेव्हरचा मोदक, कॅरॅमल मोदक, गाजराचा मोदक, काजू आणि खसखस मोदक, चॉकलेट व्हॅनिला मोदक, नारळ- कॅरॅमल आणि तळलेल्या मनुक्यांचा मोदक अशी मोठी मेजवानी एकाच डिश मध्ये खायला मिळते.
पत्ता- फन रिपब्लिक मॉल. न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम)
Bliss Over Bite, कांदिवली
ब्लिस ओव्हर बाईट, या कॅफेमध्ये मोदकाच्या मध्यभागी फ्लेव्हर टाकून काही हटके कॉम्बिनेशन्स बनवले जातात. यामध्ये मोतीचूर कोकोनट क्रंच, न्यूटेला बॉम्ब, स्ट्रॉबेरी, गुलकंद आणि केशर असे रंगीबेरेंगी मोदक उपलब्ध आहेत.
पत्ता- Bliss Over Bite, कांदिवली पूर्व
3D जेली मोदक, पवई
जपानच्या शैलीला भारतीय टच देत बनवलेला हा पदार्थ म्हणजे जेली मोदक. पवई येथील भूख बंगला कॅफे मध्ये दूध, गूळ, पुडिंग, शहाळ्याचं पाणी, साखर आणि जिलेटीन यांचा वापर केला जातो. विशेष म्हणजे हे मोदक साधारणपणे चार दिवस तरी हमखास टिकतात.
पत्ता- भूख बंगला आयआयटी मुंबई समोर, पवई
गणेशोत्सवाच्या काळात घाई गडबडीत मोदक बनवणे हे खरंतर वेळ खाऊ काम बनते यावरव उपाय म्हणून तुम्ही यंदा अगदी घरगुती पद्धतीने बनणाऱ्या मोदकांपासून ते ट्रेंडी मोदकांपर्यंत पर्याय पुरवणारे ही ठिकाणे निवडू शकता. यामुळे तुमचा वेळ ही वाचेल आणि यंदा दर्शनासाठी येणाऱ्या पाहुण्यांना काहीतरी हटके देऊन तुम्ही खुश करू शकाल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)