Dry Days 2021: यंदाच्या वर्षातील संपूर्ण सणाच्या तारखांसह पहा मुंबईत कधी असणार 'ड्राय डे'
तर काही जण आपल्या मित्र-मैत्रिणी किंवा परिवारासह फिरायला जायची तयारी करत आहेत. पण जर तुम्ही मुंबईत राहण्यासोबत ड्रिंक पार्टीचा विचार करत असल्यास तुम्हाला त्याचा स्टॉक घेऊन ठेवावा लागणार आहे.
Dry Days 2021: प्रत्येकजण यंदाच्या नव वर्षात विकेंड्सला बाहेर जाण्याचे प्लॅन करत आहेतच. तर काही जण आपल्या मित्र-मैत्रिणी किंवा परिवारासह फिरायला जायची तयारी करत आहेत. पण जर तुम्ही मुंबईत राहण्यासोबत ड्रिंक पार्टीचा विचार करत असल्यास तुम्हाला त्याचा स्टॉक घेऊन ठेवावा लागणार आहे. विचार करा जर तुम्ही ड्राय डे च्या दिवशी दारू पिण्याच्या प्लॅन करतायत पण दारुची दुकाने बंद आहे. अशावेळी तुमचा प्लॅन फिसकटला जाऊ शकतो. त्यामुळेच आधीच दारुची सोय तुम्हाला करुन ठेवावी लागणार आहे. अशातच आम्ही तुम्हाला यंदाच्या वर्षातील सणउत्सवांसह यंदाच्या 2021 मध्ये कधी ड्राय डे असणार त्या बद्दल अधिक माहिती देणार आहोत. येथे तुम्हाला ड्राय डे लिस्ट डाऊनलोड करता येणार आहे.
भारतातील अन्य शहरांपैकी मुंबईतच सर्वाधिक प्रमाणात दारुचे सेवन केले जाते. पण जर तुम्ही ड्राय डे च्या दिवशी दारुची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते कायद्याच्या विरोधात आहे. कारण ड्राय डे च्या दिवशी दारु विक्री करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळेच मुंबईतील ड्राय डे बद्दल येथे तुम्हाला अधिक जाणून घेता येणार आहे.
जानेवारी
14 (गुरुवार)- मकर संक्रात
26 (मंगळवार)- प्रजासत्ताक दिन
30 (शनिवार)- शहीद दिवस
फेब्रुवारी
19 (बुधवार)- छत्रपती शिवाजी महाराज जयंती
मार्च
8 (सोमवार)- स्वामी विवेकानंद सरस्वती जयंती
11 (गुरुवार)- महाशिवरात्री
29 (सोमवार)- होळी
एप्रिल
2 (शुक्रवार)- गुड फ्रायडे
14 (बुधवार)- आंबेडकर जयंती
25 (रविवार)- इद-उल फितर
जुन- ड्राय डे नाही
जुलै
20 (मंगळवार)- आषाढी एकदशी
24 (रविवार)- गुरु पौर्णिमा
ऑगस्ट
10 (मंगळवार)- मोहरम
15 (रविवार)- स्वातंत्र्य दिन
30 (सोमवार)- जन्माष्टमी
सप्टेंबर
10 (शुक्रवार)- गणेश चतुर्थी
19 (रविवार)- अनंत चतुर्दशी
ऑक्टोंबर
2 (शनिवार)- गांधी जयंती
8 (शुक्रवार)- प्रोहिबिशन वीक
15 (शुक्रवार)- दसरा
18 (सोमवार)- इद- ए- मिलाद
20 (बुधवार)- महर्षी वाल्मिकी जयंती
नोव्हेंबर
14 (रविवार)- कार्तिकी एकादशी
19 (शुक्रवार)- गुरु नानक जयंती
डिसेंबर महिन्यात एकादी ड्राय डे नसणार आहे. पण जर तुम्ही वरील ड्राय डे आणि सणांच्या तारखा पाहिल्यास तुम्हाला ड्रिंक पार्टी नक्की कधी करायची याचा अंदाज नक्कीच येईल.