एका आठवड्यापेक्षा कमी दिवसात देशातील 35 टक्के लोक Fast Food खातात!

खरंतर लोकांमधील शारिरिक उर्जा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Pixabay)

घड्याळ्याच्या काट्यावर चालणारे दैनंदिन जीवन, कामाचे ओझे आणि मानसिक तणाव यामुळे लोकांमध्ये वाईट सवयींचे प्रमाण वाढलेले दिसून येते. खरंतर लोकांमधील शारिरिक उर्जा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. थोडे जरी चालले तरही शरीरातीव उर्जा कमी झाल्याने थकवा जाणवतो.याचे परिणाम आयुष्यात पुढे जाऊन दीर्घकाल सहन करावे लागतात. त्यामुळे आम्ही सांगत आहोत कोणत्या गोष्टींचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच जर तुम्हाला तंदुरुस्त आरोग्य जगायचे असेल तर हे नक्की वाचा.

- 28.6 टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात

ग्लोबल अडल्ड टोबँकोने केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारतात एकूण 130 करोड जनसंख्येपैकी 28.6 टक्के लोर तंबाखूचे सेवन करतात. रिपोर्टनुसार, जवळजवळ 18.4 टक्के तरुण हे सिरगेट नाहीच तर बीडी, अफीम, गांजा आणि खैनी सारखे मादक पदार्थांचे सेवन करतात. तर दिवसागणिक तंबाखू खाण्याची संख्या वाढत चालली आहे.

- 11 वर्षात दुप्पटीने दारु विक्री

भारतात गेल्य 11 वर्षात दारु पिणाऱ्यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. यापूर्वी व्यक्तीची 3 लीटर दारु पिण्याची क्षमता आता 6 लीटर एवढी झाली आहे.रिपोर्ट्नुसार, भारतातील तरुणांमध्ये तंबाखू आणि दारु सोबत ड्रग्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे. तर ड्रग्ज आणि मादक पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील उर्जेचा अधिकाधिक उपयोग होतो. त्यामुळे शरीरातील फुफ्फुसे आणि मुत्रपिंडाला धोका संभवण्याची जास्त शक्यता असते.

-जंक फूड

खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये गेल्या काही वर्षात खूप बदल झाले आहेत. फक्त शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात ही जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. 2018 मध्ये क्लिंट यांनी दिलेल्या माहितीनुसार, 35 टक्के लोक एका आठवड्याच्या कमी कालावधीतच जंक फूड मोठ्या प्रमाणात खातात. याचा परिणाम शाळेत जाणाऱ्या मुलांवर होत असून त्यांच्यात लठ्ठपणाची लक्षणे दिसून येत आहेत. कमी वयात लठ्ठपणामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याने ते आरोग्यास हानिकार ठरु शकते.

- झोप झाली गायब

बदलती जीवनशैली आणि लाइफस्टाईलमुळे झोप कमी झाली आहे. कामाचे ओझे, शिक्षणाची चिंता, नात्यातील भांडण यासारख्या अनेक गोष्टींमुळे मानवी जीवनावर परिणाम होताना दिसून येत आहे. यामुळे झोपण्याची वेळ दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तसेच पुरेशा प्रमाणात झोप न घेतल्यास हृदयाचे विकार आणि लठ्ठपणा वाढण्याची शक्यता खूप असते.