World Radio Day 2020: जगभरात का साजरा केला जातो वर्ल्ड रेडिओ दिवस? जाणूया घ्या याचा इतिहास
भारतामध्ये स्वातंत्र्यलढ्यापासून ते आज अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मन की बात (Mann Ki Baat) या कार्यक्रमापर्यंत रेडिओची जादू टिकून आहे. रेडिओचं हेच महत्त्व ओळखून 9 वर्षांपासून जगभरात 'वर्ल्ड रेडिओ डे' साजरा केला जातो.
World Radio Day 2020 Importance: प्रभावी जनसंपर्काचे साधन म्हणून ज्या कडे पाहिले जाते तो म्हणजे 'रेडिओ'(Radio). 19 व्या शतकात जेव्हा मोबाईल, इंटरनेट, पेजर, टीव्ही यांसारखे माध्यम नव्हते तेव्हा रेडिओ म्हणजेच आकाशवाणी च्या माध्यमातून अनेक बातम्यांवर चर्चा केली जायची. मात्र जसजसा काळ बदलत गेला तसतसे रेडिओचा वापर कमी होताना दिसू लागला. आणि त्याची जागा टीव्ही, मोबाईल आणि इंटरनेट ने घेतली. मात्र रेडिओ हे माध्यम पूर्णपणे नष्ट होऊ नये यासाठी त्यात थोडा नवेपणा आणण्यासाठी FM सुरु करण्यात आले. ज्याने संपूर्ण देशाला वेडं लावले. भारतामध्ये स्वातंत्र्यलढ्यापासून ते आज अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मन की बात (Mann Ki Baat) या कार्यक्रमापर्यंत रेडिओची जादू टिकून आहे. रेडिओचं हेच महत्त्व ओळखून 9 वर्षांपासून जगभरात 'वर्ल्ड रेडिओ डे' साजरा केला जातो.
मात्र आपल्यापैकी अनेकांना हा दिवस का साजरा केला जातो असे विचारल्यास अनेकांकडे याचे उत्तर नसेल. World Radio Day 2019: यंदा 'वर्ल्ड रेडिओ डे'च आठवं सेलिब्रेशन, पहा 13 फेब्रुवारी हा दिवस कसा ठरवण्यात आला?
का साजरा केला जातो World Radio Day?
रेडिओचा शोध 1900 मध्ये इटालियन वैज्ञानिक गुल्येल्मो मार्कोनी ने लावला होता. मात्र याचे योग्यरित्या मुल्यांकन 13 फेब्रुवारी मध्ये केला गेला. जेव्हा जगाने या उपकरणाला शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत हा पोहोचलेला पाहून संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने (United Nations Educational Scientific and Cultural Organization) (युनेस्को) या दिवसाला 'जागतिक रेडिओ दिवस' म्हणून घोषित केला.तेव्हापासून गेली 9 वर्षे हा दिवस World Radio Day म्हणून साजरा केला जात आहे.
Radio हा मूळ लॅटीन शब्द "radius" मधून निर्माण झाला आहे. spoke of a wheel, beam of light, ray असा त्याचा अर्थ होतो. सुरूवातीला रेडिओ हा 'वायरलेस टेलिग्राफी' अशा स्वरूपात ओळखला जायचा.
सध्याच्या काळात FM पाठोपाठ 'सारेगमपा कारवा' असं रेडिओ सारखं दिसणारे एक नवीन संगीताचे उपकरण आणले आहे. यात 4000 हून अधिक गाण्यांचा संग्रह आहे खरा पण उपकरण लोकांना आवडलं ते त्याला दिलेल्या रेडिओच्या लूक मुळे. रेडिओ चे कितीही प्रकार येवो पण जुन्या रेडिओची सर कशालाच येणार नाही हेही तितकेच खरे आहे.