World Environment Day 2020: यंदाच्या जागतिक पर्यावरण दिन थीम विषयी जाणून घ्या सविस्तर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा केले 'हे' खास आवाहन
यंदाच्या पर्यावरण दिनाची थीम ही जैवविविधता यावर आधारीत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासीयांशी मन की बात (Maan Ki Baat) मध्ये संवाद साधताना सुद्धा या मुद्द्यावर विशेष भर देऊन नागरिकांना आवाहन केले आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे (United Nations) 1972 साली पर्यावरण दिन (World Environment Day) साजरा करण्याचा निर्णय झाला, यानुसार 1973 मध्ये 5 जून रोजी पहिल्यांदा पर्यावरण दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यंदा सुद्धा येत्या शुक्रवारी पर्यावरण दिन साजरा होणार आहे, जगभरातील तब्बल 143 देश या दिवसाचे सेलिब्रेशन करणार आहेत. यंदाच्या पर्यावरण दिनाची थीम ही जैवविविधता यावर आधारीत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासीयांशी मन की बात (Maan Ki Baat) मध्ये संवाद साधताना सुद्धा या मुद्द्यावर विशेष भर देऊन नागरिकांना आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींनी, पर्यावरण दिनाच्या निमित्ताने रेन वॉटर हार्वेस्टींग, वृक्षारोपण करून येत्या वर्षभरासाठी हा दिवस साजरा करण्यास सांगितले आहे. मागील काही काळात लॉकडाउन (Lockdown) मुळे अनेक देशातील प्रदूषणाचा टक्का कमालीने उतरला आहे. ही सकारात्मक बाब असून येत्या काळात निदान हा टक्का यतरी कायम राहावा यासाठी प्रयत्न केले जावेत असेही आवाहन मोदींनी केले आहे. हे ही वाचा -अशी झाली जागतिक पर्यावरण दिनाची सुरुवात; काय आहे पर्यावरण दिनाचं महत्त्व
तसेच, यंदाची थीम म्हणजेच जैवविविधता रक्षण करण्याच्या दृष्टिकोनाकातून काही छोटी आणि महत्वाचे पाऊले उचलता येतील असेही मोदींनी सुचवले आहे. सध्या उन्हाळा सुरु असल्याने आपल्या आजूबाजूला असणाऱ्या पक्षी आणि प्राणी यांना पाणी, आणि खाणे उपलब्ध करून देणे हे त्यातील महत्वाचे आणि अगदी सोप्पे पाऊल आहे त्याचा सर्वांनी विचार करावा असेही मोदी म्हणाले. येत्या काही दिवसात भारतात मान्सून दाखल होईल, अशावेळी देशातील गावखेड्यांनी पावसाच्या पाण्याचा साठा आणि संवर्धन करण्याचे मार्ग अवलंबावेत. यामुळे जमिनीतील पाण्याचा साठा वाढण्यास मदत होते. ही आपली जबाबदारी आहे आणि आपण टी पार पडली पाहिजे अशा शब्दात मोदींनी देशवासियांना प्रोत्साहन दिले.
दरम्यान, जागतिक पर्यावरण दिनीदरवर्षी अनेक ठिकाणी रॅली आयोजित केल्या जातात. सार्वजनिक ठिकाणीही अनेक एकत्रिक कार्यक्रम होतात मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असे कार्यक्रम होणार नाहीत. तरीही प्रत्येकाने निदान स्वतःला जमेल त्या पद्धतीने या दिवसाचे महत्व सर्वांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे.