Constitution Day 2024 Messages In Marathi: भारतीय संविधान दिनानिमित्त Wishes, Images, Quotes, Greetings द्वारे मित्र-परिवारास द्या खास शुभेच्छा!

त्यामुळे संविधान दिनाच्या दिवशी तुम्ही आपल्या मित्र-परिवारास संविधान दिन मराठी कोट्स, संविधान दिन मराठी संदेश, संविधान दिन शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील प्रतिमा मोफत डाऊनलोड करू शकता.

Constitution Day 2024 Messages 7 (Photo Credit - File Image)

Constitution Day 2024 Messages In Marathi: भारतात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन (Constitution Day 2024) साजरा केला जातो. कारण, या दिवशी भारताने नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना (Constitution) स्वीकारली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकारल्यानंतर, 26 जानेवारी 1950 रोजी संपूर्ण देशात राज्यघटना लागू होण्यास काही महिने लागले. त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय राज्यघटनेत अनेक तत्त्वे आहेत, ज्यांच्या आधारावर देशातील सरकार आणि नागरिकांसाठी मूलभूत, राजकीय तत्त्वे, कार्यपद्धती, अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, कायदे इत्यादी ठरवण्यात आले आहेत. भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी संविधान एक महत्त्वूपूर्ण दस्तऐवज आहे. त्यामुळे संविधान दिनाच्या दिवशी तुम्ही आपल्या मित्र-परिवारास संविधान दिन मराठी कोट्स, संविधान दिन मराठी संदेश, संविधान दिन शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील प्रतिमा मोफत डाऊनलोड करू शकता.

संविधान दिन मराठी मेसेज - 

संविधान कितीही वाईट असू दे

ते चांगले होऊ शकते

जर त्याचे पालन करणारे लोक चांगले असतीलट

भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Constitution Day 2024 Messages 1 (Photo Credit - File Image)

जिथे माणसा माणसात भेद आहे,

त्या पुस्तकाचे नाव वेद आहे...

जिथे प्रत्येक व्यक्ती समान आहे,

त्या व्यक्तीचे नाव संविधान आहे...

भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Constitution Day 2024 Messages 2 (Photo Credit - File Image)

करून जीवाचे रान,

दिला सर्वांना समतेचा मान

अशी भिमरावांची शान भल्याभल्यांची झुकते

सन्मानाने मान...

संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Constitution Day 2024 Messages 3 (Photo Credit - File Image)

उत्सव तीन रंगाचा

आज सजला!

नतमस्तक आम्ही त्या सर्वांना

ज्यांनी भारत देश घडविला!!

संविधान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Constitution Day 2024 Messages 4 (Photo Credit - File Image)

लेखणी तर सर्वांच्या हातात होती

ताकत तर सर्वांच्या मनगटात होती

पण राज्यघटना लिहण्याची क्षमता

फक्त बाबासाहेबांच्या रक्तात होती

संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Constitution Day 2024 Messages 5 (Photo Credit - File Image)

हजारो वेळा चंद्र सूर्य निघाले,

पण प्रकाशाचा अर्थ कळला नव्हता,

जर बाबासाहेब जन्मालाच आले नसते,

तर जगण्याचा अर्थ आजही आम्हा कळला नसता.....

संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Constitution Day 2024 Messages 6 (Photo Credit - File Image)

तथापी, 25 जून 1975 हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील काळा दिवस संबोधला जातो. याच दिवशी संविधान डोळ्यासमोर ठेवून आणीबाणी जाहीर करण्यात आली. हा निर्णय तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतला आणि त्यामुळे स्वतंत्र भारतातील जनता सरकारची गुलाम झाली. 25 जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून साजरा केला जातो.