When is National Son's Day 2020? कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस? जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण

तर त्याबद्दलच सविस्तर माहिती देण्यासाठी हा खास लेख. राष्ट्रीय पुत्र दिन कधी व का साजरा करतात यामागचे खरे कारण जाणून घ्या.

National Sons Day (Photo Credits: File)

मुलगा (Son) म्हणजे वंशाचा दिवा जो आपला वंश चालवतो असे आजपर्यंत ऐकायला मिळत आहे. आपल्या आई-वडिलांचा आणि प्रसंगी घराचा संपूर्ण भार स्वत:च्या खांद्यावर उचलणारा देशभरातील तमाम पुत्रांच्या सन्मान करण्यासाठी देशभरात राष्ट्रीय पुत्र दिवस (National Son's Day) साजरा केला जातो. आज देशभरात राष्ट्रीय कन्या दिन (National Daughters Day) साजरा केला जात आहे. त्यामुळे अनेकांना राष्ट्रीय पुत्र दिन कधी असतो असा प्रश्न पडला असेल. तर त्याबद्दलच सविस्तर माहिती देण्यासाठी हा खास लेख. राष्ट्रीय पुत्र दिन कधी व का साजरा करतात यामागचे खरे कारण जाणून घ्या.

आपला देश पुरुषप्रधान देश असल्यामुळे मुलांच्या संगोपनावर विशेष भर दिला जातो. आपल्या आई-वडिलांच्या काळजाचा तुकडा जो त्यांच्या उतारवयात त्यांची सेवा करतो, घराची जबाबदारी घेतो त्या मुलाच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. अनेकांचे मत आहे की हा दिवस 4 मार्चला साजरा केला जातो तर अनेक जण सांगतात हा दिवस 28 सप्टेंबरला साजरा केला जातो. कदाचित त्या त्या ठिकाणामुळे हा दिवस वेगवेगळा असेल मात्र त्या मागचा उद्देश हा लाडक्या लेकासाठी हा दिन साजरा करणे हाच आहे. National Daughter's Day 2020: राष्ट्रीय कन्या दिवस यंदा कधी साजरा होणार? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास

ज्यांच्या पोटी मुलगा जन्माला येतो त्या आईवडिलांचा सन्मान करण्याचा हा दिवस. वेळप्रसंगी घरातील जबाबदार पुरुष बनून घरावर येणारे सर्व संकटे, अडचणी दूर करतो. त्यामुळे प्रत्येक घरात या वंशाच्या दिव्याची विशेष काळजी घेतली जाते. या पुत्रांचे विशेष कौतुक करण्यासाठी देशभरात राष्ट्रीय पुत्र दिवस साजरा केला जातो. तसं पाहायला गेले तर आतापर्यंत या दिनाच्या 2 तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. ज्यात एक आहे 4 मार्च आणि दुसरी आहे 28 सप्टेंबर.