Jaya Ekadashi 2021: जया एकादशी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि धार्मिक महत्त्व

या दिवशी रवि योग आणि त्रिपुष्कर योग आहेत. या दिवशी जया एकादशीची कथा ऐकली जाते आणि उपवास केला जातो.

Lord Vishnu (Photo credits: Facebook)

Jaya Ekadashi 2021: हिंदी पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दिवशी जया एकादशीचे व्रत केले जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. यंदा जया एकादशी 23 फेब्रुवारी रोजी म्हणजेचं मंगळवारी पडत आहे. या दिवशी रवि योग आणि त्रिपुष्कर योग आहेत. या दिवशी जया एकादशीची कथा ऐकली जाते आणि उपवास केला जातो. जया एकादशीचा मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व खालील मुद्द्यांच्या आधारे जाणून घेऊयात.

जया एकदशी 2021 तारीख -

यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी तारीख सोमवार, 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 05.16 वाजता सुरू होत आहे. याची समाप्ती मंगळवारी, 23 फेब्रुवारी रोजी संध्या 06.05 वाजता होईल. त्यामुळे जया एकादशी 23 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येईल. (वाचा - Haridwar Kumbh Mela 2021: यंदा हरिद्वार मधील कुंभमेळा एप्रिल महिन्यात अवघ्या 30 दिवसांचा)

जया एकादशी 2021 पूजा मुहूर्त -

23 फेब्रुवारी रोजी रवि योग सकाळी 06:52 ते दुपारी 12:31 आणि त्रिपुस्कर योग दुसर्‍या दिवशी 24 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 06.05 ते सकाळी 06.01 पर्यंत आहे. जया एकादशी रवि योगात साजरी करण्यात येईल. या दिवशी राहुकाळ दुपारी 03: 26 ते संध्याकाळी 4 वाजून 51 या वेळेत आहे.

जया एकादशीच्या व्रताचे महत्त्व -

जया एकादशीचे व्रत ठेवल्यास मोक्ष प्राप्त होतो. जया एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीची सर्व पाप नाहीशे होतात. तसेच त्याला स्वर्गात स्थान मिळते.