Vinayaka Chaturthi 2023 Messages: विनायक चतुर्थीनिमित्त खास मराठी Images, Wishes, Whatsapp Status शेअर करून द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा
मान्यतेनुसार माघ शुक्ल चतुर्थीला कश्यपमुनी आणि अदिती या दांपत्याच्या पोटी गणपतीने `महोत्कट विनायक' नावाने जन्म घेतला आणि राक्षसांचे पारिपत्य केले होते.
प्रत्येक हिंदू महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी (Vinayaka Chaturthi 2023) म्हणतात. फाल्गुन महिन्यात येणारी विनायक चतुर्थी यावेळी 23 फेब्रुवारी 2023 रोजी येत आहे. या दिवशी गणेशाची पूजा-अर्चना केली जाते. धार्मिक मान्यतांनुसार विनायक चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. पंचांगानुसार, विनायक चतुर्थी 23 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे 3.24 वाजता सुरू झाली. ही दिवसभर असणार आहे. या दिवशी उपवासही केला जाईल. सकाळी 11.26 ते दुपारी 1.43 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे.
विनायक चतुर्थी व्रताबद्दल असे मानले जाते की, वर्षातील 12 महिने हे व्रत करून शेवटच्या व्रतावेळी दान केल्यास व्रतातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर विनायक चतुर्थीनिमित्त खास मराठी Images, Messages, Wishes शेअर करून द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा.
दरम्यान, विनायक चतुर्थी ही माध्यान्हव्यापिनी असावी लागते. अर्थात त्यात सूर्यदर्शनाला महत्त्व असते. मान्यतेनुसार माघ शुक्ल चतुर्थीला कश्यपमुनी आणि अदिती या दांपत्याच्या पोटी गणपतीने `महोत्कट विनायक' नावाने जन्म घेतला आणि राक्षसांचे पारिपत्य केले होते. विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी सोडावे, असे शास्त्रात म्हटले आहे.