Vat Purnima Vrat 2020: वटपौर्णिमा यंदा 5 जून ला होणार साजरी; सुवासिनींसाठी खास अशा 'या' व्रताचे महत्त्व आणि मुहूर्त जाणून घ्या

वटपौर्णिमा साजरी करण्यामागे काय कारण आहे तसेच यंदा या सणाचा मुहूर्त काय आहे याविषयी आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

Vat Purnima 2020 (File Image)

Vat Purnima Vrat Importance: सुवासानींसाठी खास असा वटपौर्णिमा (Vat Purnima Vrat) सण यंदा 5 जून रोजी साजरा होणार आहे. दरवर्षी विवाहित महिला मोठ्या उत्साहात वडाच्या झाडाला फेऱ्या मारून, वाण लुटून हा सण साजरा करतात. पावसाची हलकी सुरुवात झाली असताना मनमोहक अशा निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची संधी या सणाच्या निमित्ताने मिळते. यंदा मात्र कोरोनाच्या (Coronavirus) संकटामुळे शक्य असल्यास बाहेर जाऊन वडाच्या झाडाची पूजा करणे टाळावे, किंवा बाहेर जाणे अगदी सहज शक्य असल्यास झाडाभोवती गर्दी करु नये, मास्क लावून पूजा करावी अशा सर्व बाबींची नक्की काळजी घ्यावी. वटपौर्णिमा साजरी करण्यामागे काय कारण आहे तसेच यंदा या सणाचा मुहूर्त काय आहे याविषयी आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

वटपौर्णिमा व्रताचे महत्व

पारंपारिक पद्धतीनुसार ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीपासून तीन दिवस उपवास ठेवून वट सावित्रीचं व्रत केलं जातं. मात्र आजकाल अनेक स्त्रिया घर, संसार आणि करियर यांच्यमध्ये कसरत करत असल्याने केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास, वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना करतात. यमाला हरवून पतीचे प्राण परत मिळवणार्‍या सावित्रीच्या पातिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते. पुराणानुसार वड हा यज्ञवृक्ष म्हणून ओळखला जातो. या वटवृक्षाचे आयुष्य अधिक असते. असेच अधिक आयुष्य आपल्या पतीला प्राप्त व्हावे असा हेतू या वटवृक्षाच्या पूजेमागे असतो. तसेच वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीचीच पूजा करण्यासारखे आहे असेही मानले जाते.

वटपौर्णिमा 2020 ची तिथी आणि मुहूर्त

वटपौर्णिमा दिवस :5  जून 2020 

वटपौर्णिमा मुहूर्त: 5 जून पहाटे 03:15 ते 6 जून पहाटे 12:41 AM

दरम्यान, हा सण पारंपरिक आहे. यास धार्मिक महत्व आहे म्ह्णून जर का तुम्हाला सण साजरा करावा अशी इच्छा नसेल तरी असे सण पतिपत्नीला एकमेकांविषयी वाटणाऱ्या भावना त्यांना एकमेकांपर्यंत पोहचवण्यासाठी चांगली संधी देऊन जातात. त्यामुळे केवळ पत्नीनेच हे व्रत करावे असे काही पती मंडळी सुद्धा आपल्या लाडक्या पत्नीसाठी यंदा हे व्रत ठेवून एकमेकांसोबत वेळ घालवून हा सण साजरा करु शकतात.