Valmiki Jayanti 2024 Messages: महर्षि वाल्मिकी जयंतीच्या दिवशी खास मराठी Wishes, WhatsApp Status, Greetings शेअर करून द्या शुभेच्छा

अशा स्थितीत गुरुवार, 17 ऑक्टोबर रोजी वाल्मिकी जयंती साजरी होणार आहे.

Valmiki Jayanti 2024 Messages (File Image)

Valmiki Jayanti 2024 Messages in Marathi: हिंदू कॅलेंडरनुसार, वाल्मिकी जयंती (Valmiki Jayanti 2024) दरवर्षी अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यावर्षी वाल्मिकी जयंती 17 ऑक्टोबर रोजी साजरी होणार आहे. हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या महाकाव्यांपैकी एक असलेल्या रामायणाची रचना त्यांनी केली. त्यांना आदिकवी म्हणूनही ओळखले जाते. वाल्मिकी जयंती दिवशी वाल्मिकी समाजातील लोक वाल्मिकीजींची पूजा करतात. वाल्मिकीजींना त्यांच्या विद्वत्ता आणि तपश्चर्येमुळे महर्षी ही पदवी मिळाली होती. याशिवाय, त्यांना संस्कृतचे आदिकवी म्हणजेच संस्कृत भाषेचे पहिले कवी म्हणूनही ओळखले जाते.

आश्विम महिन्याची पौर्णिमा 16 ऑक्टोबर रोजी रात्री 08:40 वाजता सुरू होत आहे व 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 04:55 वाजता ती संपेल. अशा स्थितीत गुरुवार, 17 ऑक्टोबर रोजी वाल्मिकी जयंती साजरी होणार आहे. महर्षी वाल्मिकी यांनी वनवासात रामाची भेट घेतली होती असे मानले जाते. प्रभू रामाने सीतेला अयोध्येच्या राज्यातून हद्दपार केल्यानंतर त्यांनी सीतेचे रक्षण केले आणि तिला आश्रय दिला. तिच्या आश्रमातच तिने लव आणि कुश या जुळ्या मुलांना जन्म दिला.

तर असे रामायणाचे रचनाकर्ते, थोर महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त खास Images, HD Wallpapers, Greetings, Wishes पाठवून द्या शुभेच्छा.

Valmiki Jayanti 2024 Messages
Valmiki Jayanti 2024 Messages
Valmiki Jayanti 2024 Messages
Valmiki Jayanti 2024 Messages
Valmiki Jayanti 2024 Messages

दरम्यान, भगवान वाल्मिकींना ‘श्रीराम’ च्या जीवनात घडलेल्या प्रत्येक घटनेची पूर्ण माहिती होती. सत्ययुग, त्रेता आणि द्वापर या तिन्ही कालखंडात वाल्मिकींचा उल्लेख आढळतो. वाल्मिकींचे वर्णन महाभारत काळातही आढळते. पांडव कौरवांविरुद्ध युद्ध जिंकतात तेव्हा द्रौपदी यज्ञ करते, ज्यासाठी शंख फुंकणे आवश्यक होते. परंतु कृष्णासह सर्वांनी प्रयत्न करूनही यज्ञ यशस्वी होत नाही, म्हणून सर्वजण वाल्मिकी ऋषींची प्रार्थना करतात. वाल्मिकी तिथे प्रकट झाल्यावर ते शंख फुंकतात व द्रौपदीचा यज्ञ पूर्ण होतो.