Valentine's Day 2023 Wishes in Marathi: व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा WhatsApp Status, Messages, Quotes द्वारा देत साजरा करा प्रेमाचा दिवस
14 फेब्रुवारील हा दिवस साजरा करण्यापूर्वी आठवडाभर प्रत्येक दिवशी प्रेमाशी निगडीत एक दिवस साजरा केला जातो. ज्यात रोझ डे पासून किस डे चा समावेश असतो.
प्रेमी युगूलांसाठी खास असणारा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी. जगभर तरूणाई हा दिवस व्हेलेंटाईन डे (Valentine's Day) म्हणून साजरा करतात. आपल्या आयुष्यातील प्रिय व्यक्ती जवळ या दिवशी आपल्या मनातील प्रेमाच्या भावना व्यक्त केल्या जातात. व्हेलेंटाईन डे चा आनंद द्विगुणित करण्यासाठी या दिवशी खास गिफ्ट्स देखील दिली जातात. मग तुमच्या आयुष्यातील अशा खास व्यक्तींकडे आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही सोशल मीडीयामध्ये WhatsApp Status, Messages, Greetings, HD Images, SMSs शेअर करून आनंद द्विगुणित करू शकता.
व्हेलेंटाईन डे हा दिवस प्रामुख्याने तरूणाईसाठी खास असतो. 14 फेब्रुवारील हा दिवस साजरा करण्यापूर्वी आठवडाभर प्रत्येक दिवशी प्रेमाशी निगडीत एक दिवस साजरा केला जातो. ज्यामध्ये रोझ डे, प्रॉमिस डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रपोझ डे, किस डे साजरा करतात. पण प्रेमाचा महत्त्वाचा दिवस 14 फेब्रुवारी हा व्हेलेंटाईन डे म्हणूनच साजरा केला जातो. नक्की वाचा: Valentine's Week: प्रेमास मिळालेला नकार कसा स्वीकाराल? 'व्हॅलेंटाईन विक'मध्ये खचून जाऊ नका, समजून घ्या .
व्हेलेंटाईन डे 2023 च्या शुभेच्छा
डोळ्यातल्या स्वप्नांना कधी प्रत्यक्षात आण
किती प्रेम करतो मी तुझ्यावर हे न सांगताच जाण
व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा
तुझ्या प्रेमाचा रंग तो
अजूनही बहरत आहे
शेवटच्या क्षणा पर्यंत
मी फक्त आणि फक्त तुझीच आहे
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!
तुझे माझे नाते असे असावे
जे शब्दांच्या पलीकडे एकमेकांस उमगावे
कितीही एकमेकांपासून दूर असलो तरी
मनाने कायम एकमेकांच्या जवळ असावे
Happy Valentine's Day
ना Rose पाहिजे
ना Chocolate पाहिजे
ना Teddy ना Kiss पाहिजे
मला फक्त तुझी आयुष्यभराची साथ पाहिजे
व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा
प्रेम म्हणजे गवताचं
एक नाजूक पातं असतं
हृदयाला हृदयाशी जोडणारं
खास नातं असतं
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे !
सम्राट क्लाऊडियसला निषेध करत संत व्हेलेंटाईन यांनी जोडप्यांचं लग्न लावलं. त्याच्या या कृत्यानिमित्त व्हेलेंटाईनला जेलमध्ये टाकण्यात आले होते. 14 फेब्रुवारी 270 साली त्याला फासावरही लटकवण्यात आले. संत व्हेलेंटाईन यांनी प्रेमासाठी दिलेल्या या बलिदानाची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी 14 फेब्रुवारीला 'व्हेलेंटाईन डे' साजरा करण्याची रीत आहे. त्यामुळे जगभरात या दिवसाचं खास आकर्षण असतं.