Tulsi Vivah Mangalashtak Lyrics: तुळशीचं लग्न लावताना अचूक मंगलाष्टकं गाण्यासाठी इथे पहा त्याचे शब्द

घरात छान जेवण बनवले जाते.

Tulsi Vivah 2024 | File Image

महाराष्ट्रामध्ये दिवाळीची सांगता तुळशीच्या लग्नाने केली जाते. यंदा तुलसी विवाह 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. नेहमीच्या लग्नांप्रमाणेच तुळशीची लग्न देखील विधिवत करताना मंगलाष्टकं गायली जातात. तिन्ही सांजेला अनेक घरांमध्ये हा तुलसी विवाह सोहळा संपन्न होतो. कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो आणि भगवान विष्णू त्यांच्या चार महिन्यांच्या दीर्घ झोपेतून जागे होत पुन्हा कामाला सुरूवात करतात. या दिवसापासून सर्व शुभ कार्याला सुरुवात करता येते, असे मानले जाते. त्यामुळे विष्णू रूपी शाळीग्राम आणि लक्ष्मीच्या रूपात तुलसीचा विवाह लावण्याची पद्धत आहे. Tulsi Vivah 2024 Wishes In Marathi: तुळशी विवाहाच्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status द्वारे देत मंगलमय करा आजचा दिवस! 

महाराष्ट्रात लग्नामध्ये मंगलाष्टकं गात सर्वांच्या साक्षीने तुलसी विवाह साजरा केला जातो. मग या लग्नसोहळ्यातही मंगलाष्टकं गाण्यासाठी इथे त्याचे शब्द-

तुळशी विवाहा निमित्त मंगलाष्टके

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।

बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं ||

लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम्

ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मंगलम || १ ||

गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा ।

कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।

क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी ।

पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।। २ ।।

लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।

गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।।

अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे ।

रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।।

राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी ।

ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।।

आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे ।

रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।।

लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी ।

रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।।

दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा ।

धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा मंगलम ।। ५ ।।

लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण ।

साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ।।

सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।

गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६ ।।

विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी ।

सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ।।

रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता ।

तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ।। ७।।

आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।

गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा

दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी ।

वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।। ८ ।।

काही ठिकाणी तुळशीला साडी नेसवून आणि नवरी सारख सजवून लग्न लावले जाते आणि हळदी लावून विधिवत लग्न लावले जाते.  तुळशीचे विवाह केल्यामुळे घराघरात मंगल कार्य घडते, तुळशी विवाहनिमित्त घरात लगीन घाई बघायला मिळते. घरात छान जेवण बनवले जाते. महिला सुंदर नटतात, दारात आकर्षक रांगोळी काढली जाते, तुळशीचे विधिवत लग्न लावले जाते, असा हा तुळशी विवाहाचा सोहळा उत्साहात साजरा केला जातो.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif