Tulsi Vivah 2022 Messages: तुळशीच्या लग्नाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Messages द्वारा शेअर करत साजरा करा आजचा मंगल दिवस!
एखाद्या लग्नाप्रमाणे हा सोहळा तुम्ही देखील साजरा करणार असाल तर त्याचा आनंद तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबतही साजरा करा.
दिवाळीची सांगता ज्या सणाने होते तो म्हणजे तुळशीच्या विवाहाचा (Tulsi Vivah) दिवस! हिंदू धर्मीय कार्तिकी एकादशी नंतर तुलसीचा विवाह सोहळा करतात. या सोहळ्यात घराघरात असलेलं तुळशीचं रोप सजवून तिचा विवाह लावण्याचा संस्कार केला जातो. यंदा हा तुलसी विवाह सोहळा कार्तिकी द्वादशी ते पौर्णिमा म्हणजेच 5 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधी मध्ये पार पडणार आहे. सामान्यपणे बहुसंख्य लोक हा सोहळा कार्तिकी द्वादशी च्या दिवशी आयोजित करतात. मग तुम्हांलाही या दिवसाच्या शुभेच्छा आपल्या नातलगांना, प्रियजणांना देऊन हा दिवस खास करायचा असल्यास लेटेस्टली टीम कडून तयार करण्यात आलेली ही ग्रिटिंग्स, शुभेच्छापत्र, WhatsApp Messages, Images तुम्ही शेअर करू शकता.
तुलसी ही लक्ष्मी मातेचं रूप मानून तिचा विवाह 'विष्णू' रूपी शाळीग्रामाशी लावला जातो. महाराष्ट्रात तुळशीला नवरीप्रमाणे सजवून तिचा विवाह लावताना घरातील लहान मुलाला 'नवर'देव बनवून त्याच्याशी लग्न लावलं जातं. एखाद्या लग्नाप्रमाणे हा सोहळा तुम्ही देखील साजरा करणार असाल तर त्याचा आनंद तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबतही साजरा करा. नक्की वाचा: Tulsi Vivah 2022 Invitation Card: तुळशीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका WhatsApp Messages, Images द्वारा देत आप्तांना द्या निमंत्रण .
तुळशीच्या लग्नाच्या शुभेच्छा
ऊसाचे मांडव सजूया आपण
विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण,
तुम्हीही सामिल व्हा आमच्या आनंदात
तुळशीचे लग्न लावूया थाटात
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा
तुलसी विवाह सोहळ्याच्या मनापासून शुभेच्छा
पूर्ण होवोत तुमच्या मनातील सार्या सुप्त इच्छा
आनंदाचे, मांगल्याचे
पर्व आज तुलसी विवाहाचे
तुळशीच्या लग्नाच्या शुभेच्छा!
तदेव लग्नं सुदिनं तदेव
ताराबलं चंद्रबलं तदेव |
विद्याबलं दैवबलं तदेव
लक्ष्मीपते तेंघ्रियुगं स्मरामि ||
तुळशीच्या लग्नाच्या शुभेच्छा!
तुलसी विवाह या मंगल दिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा!
तुळशीची लग्नं पार पडली की सामान्यपणे लग्नसराई देखील सुरू होते. तुळशीच्या लग्नानंतर पुढील काही महिने हा लग्नाचा धुमधडाका सुरूच असतो. तुळशीचं लग्न घरात लावून मुलींनाही कृष्णासारखा मनासारखा वर मिळण्यास मदत होते अशी काहींची धारणा आहे. त्यामुळे घरा घरात तुळशीच्या लग्नाची धामधूम असते.