Tulsi Vivah 2019 Mangalashtak: तुलसी विवाह शुभ मुहूर्त, मंगलाष्टक ते पूजा विधी; जाणून घ्या कार्तिकी द्वादशीच्या मुहूर्तावर कसं लावाल तुळशीचं लग्न?
पारंपरिक पद्धतीने तुळशीचे लग्न लावण्याआधी आजच्या सोहळ्याचा शुभ मुहूर्त, लग्नविधी, मंगलाष्टकं याविषयी नक्की जाणून घ्या.
Tulsi Vivah Mangalashtak & Aarti: दिवाळी (Diwali 2019) नंतर कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशीच्या विवाहाला (Tulsi Vivah) सुरुवात होते. यंदा 9 नोव्हेंबर पासून तुळशी विवाहाला सुरुवात होणार असून 12 नोव्हेंबरला समाप्ती होणार आहे. वधू तुळस आणि वर बाळकृष्ण (शाळीग्राम) यांच्या लग्न सोहळ्याला हिंदू पुरणात विशेष महत्व प्राप्त आहे. काही ठिकाणी आज हा सोहळा सार्वजनिक स्तरावर साजरा केला जाणार आहे तर काही ठिकाणी घरगुती पद्धतीने आज तुळशीचे लग्न लावले जाईल. हिंदू कालदर्शिकेनुसार, आजपासून तुळशी विवाहाला प्रारंभ झाला असला तरी विविध ठिकाणी यासाठी अनेक काल नियोजित असतात. त्यामुळे, पारंपरिक पद्धतीने तुळशीचे लग्न लावण्याआधी आजच्या सोहळ्याचा शुभ मुहूर्त, लग्नविधी या विषयी नक्की जाणून घ्या.
तुळशीला नव्या नवरीप्रमाणे सजवून अगदी यथासांग पद्धतीने लग्न लावण्याची पद्धत आहे. तुळशीचं लग्न लावणार्याला कन्यादानाचे पुण्य लाभते तसेच घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. त्यामुळे, या खास सोहळ्याला पारंपरिक मंगलाष्टके म्हणत तुमच्या अंगणातील तुळशीचे लग्न लावून द्या.
तुळशी विवाह शुभ मुहूर्त - (Tulsi Vivah Muhurt 2019)
द्वादशी तिथी आरंभ: 8 नोव्हेंबर 2019 दुपारी 12:24 वाजल्यापासून
द्वादशी तिथी समाप्ती: 9 नोव्हेंबर 2019 दुपारी 02:39 वाजेपर्यंत
कसे कराल तुळशीचं लग्न
तुळशीच्या रोपाची घरात रुजवणी केल्यानंतर सुमारे 3 वर्षांनी तिचा विवाह करण्याची पद्धत आहे. तुळशीच्या विवाहादिवशी तुळशीला नववधूप्रमाणे नटवले जाते. तुळशीभोवती रांगोळी काढून वृंदावनात ऊस पुरून त्यामध्ये आवळा, चिंच, बोरं, उसाची दांडी, हळकुंड आणि हिरव्या बांगड्या ठेवल्या जातात. तुळशीच्या चारी बाजूंनी ऊसाचा मंडप उभारला जातो. सोबतच विष्णुस्वरूप श्रीबाळकृष्णाची पूजा केली जाते . घरात शाळीग्राम दगड असल्यास त्याच्यासोबत किंवा घरातील किशोरवयीन मुलासोबत मंगलाष्टाकाच्या घोषात तुळशी विवाह संपन्न होतो. यानंतर घरात गोडाधोडाच्या पदार्थाचे वाटप केले जाते.
तुळशी विवाहासाठी मंगलाष्टक
कार्तिकी एकादशीला चार महिने निद्रिस्त अवस्थेमध्ये असलेले भगावान विष्णू जागे झाल्यानंतर कार्तिकी द्वादशी ते कार्तिकी पौर्णिमा दरम्यान तुलसी विवाह सोहळा पार पडतो. आणि त्यानंतर शुभ कार्याची, लग्न समारंभाची सुरुवात होते. या खास सणा निमित्त लेटेस्टली परिवाराकडून तुम्हालाही तुळशीच्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा!