IPL Auction 2025 Live

Tilkund Chaturthi 2024 Date: यंदा तिलकुंद चतुर्थी 12 फेब्रुवारीला; जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व!

या दिवशी बाप्पाच्या जन्म दिवसाचा उत्सव साजरा करताना घरोघरी गणपतीची लहान मूर्ती देखील आणली जाते

Ganpati | Representational image (Photo Credits: pixabay)

गणेश भक्तांसाठी भाद्रपदातील गणेश चतुर्थी प्रमाणे माघ महिन्यातील गणेश जयंतीचा (Ganesh Jayanti) दिवस देखील महत्त्वाचा असतो. तिलकुंद चतुर्थीला (Tilkund Chaturthi)  गणेश जयंती साजरी करण्याची पद्धत आहे. यंदा तिलकुंद चतुर्थी 12 फेब्रुवारी दिवशी आहे. वातावरणामधिल गारवा पाहता शरीरात स्निग्धता वाढवण्यासाठी तीळाचे सेवन केले जाते. तिलकुंद चतुर्थी दिवशी देखील बाप्पाला तिळाचा वापर करून नैवेद्य बनवला जातो. मग जाणून घ्या या तिलकुंद चतुर्थीचं महत्त्व काय ?

गणेश जयंती दिवशी हळद किंवा सिंदुर यांचा वापर करून गणेश मुर्ती बनवली जाते. या गणपतीची विधीवत पूजा करून त्याचे दुसर्‍या दिवशी विसर्जन केले जाते. तसेच पूजा विधींमध्ये या दिवशी सकाळी स्नान करताना तीळाच्या पेस्टने मसाज करून आंघोळ केली जाते. गणेशभक्तांसाठी खास असलेल्या या दिवशी घरगुती स्वरूपात गणेश पूजन केले जाते. गणेश मंदिरामध्येही दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.

बुद्धीची देवता श्रीगणेशाचा हा जन्म दिवस म्हणून देखील मोठा उत्सव साजरा केला जातो. मनोकामना पूर्ण करण्यासाठी या दिवशी काही गणेश भक्त दिवसभराचा उपवास देखील ठेवतात. या दिवशी देखील काही जण चंद्र दर्शन टाळतात. दंतकथेनुसार, जो व्यक्ती या दिवशी चंद्र पाहतो, त्याला मिथ्या दोष नावाच्या चुकीच्या आरोपांमुळे मानसिक त्रास सहन करावा लागतो. Maghi Ganesh Jayanti Special Modak Recipes: माघी गणेश जयंती विशेष नैवेद्याला तीळाचे मोदक कसे बानवाल? 

तिलकुंद चतुर्थी वरद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी बाप्पाच्या जन्म दिवसाचा उत्सव साजरा करताना घरोघरी गणपतीची लहान मूर्ती देखील आणली जाते. या निमित्ताने गणेश मंदिरात फुलांची आकर्षक सजावट केली जाते. भक्तांच्या गर्दीने सारी मंदिरं फुलून जातात.

टीप: हा लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला असून त्यामधील कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.