Tanaji Malusare Death Anniversary 2024 Images: नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त Messages, WhatsApp Status द्वारे अर्पण करा आदरांजली

तानाजी मालुसरे गेल्याची बातमी कळल्यानंतर ‘गड आला, पण सिंह गेला’ असे शब्द महाराजांच्या तोंडातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून ‘सिंहगड’ केले.

Tanaji Malusare Death Anniversary 2024 Images (File Image)

Tanaji Malusare Death Anniversary 2024 Marathi Images: कोंढाणा किल्ल्यावरील (Kondhana Fort) लढाईमध्ये आपल्या प्राणांची आहुती देऊन गड काबीज करणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे (Narveer Tanhaji Malusare) यांचे नाव इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. मराठा साम्राज्यातील वीर योद्धा तानाजी मालुसरे 4 फेब्रुवारी 1670 कोंढाणा किल्ल्यावर धारातीर्थी पडले होते. येत्या 4 फेब्रुवारीला म्हणजेच शनिवारी तानाजी मालुसरे यांची आज 354 वी पुण्यतिथी (Tanaji Malusare Death Anniversary 2024) असेल. या दिवशी या शूर मराठा योद्ध्याच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली जाते.

शूरवीर, नरवीर तानाजी मालुसरे हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे मित्र, विश्वासू सहकारी होते. कोंढाणा किल्ला स्वराज्यात आणण्याची महाराजांची इच्छा त्यांनी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देऊन पूर्ण केली. नरवीर तानाजींनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाला आणि ‘गड आला, पण सिंह गेला’ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक उद्गारांना 4 फेब्रुवारी 2024 रोजी 354 वर्षे पूर्ण होत आहेत.

तर अशा या स्वतःपेक्षा स्वराज्याला, भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या, आपल्या बलिदानाने स्वराज्याचा पाया भक्कम करणाऱ्या, शूरवीर, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त Messages, WhatsApp Status द्वारे अर्पण करा आदरांजली.

Tanaji Malusare Death Anniversary 2024 Images
Tanaji Malusare Death Anniversary 2024 Images
Tanaji Malusare Death Anniversary 2024 Images
Tanaji Malusare Death Anniversary 2024 Images
Tanaji Malusare Death Anniversary 2024 Images
Tanaji Malusare Death Anniversary 2024 Images

दरम्यान, तानाजी मालुसरे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्याच्या गोदाली गावात झाला होता. तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आणि सामर्थ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना ‘सिंह’ म्हणायचे. तर शिवाजी महाराजांना 1965 मध्ये पुरंदरच्या तहात कोंढाणा किल्ला मुघलांना द्यावा लागला होता. हा किल्ला स्वराज्यात परत यावा अशी जिजाऊंची तसेच महाराजांची इच्छा होती. हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलाचे लग्न सोडून तानाजी मालुसरे कोंढाणा सर करण्यासाठी गेले.

कोंढाण्यावर मुघलांशी झुंज देत मराठ्यांनी गड आपल्या हाती घेतला, परंतु, या युद्धात तानाजी मालुसरे यांना वीरगती प्राप्त झाली. तानाजी मालुसरे गेल्याची बातमी कळल्यानंतर ‘गड आला, पण सिंह गेला’ असे शब्द महाराजांच्या तोंडातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून ‘सिंहगड’ केले.