Mangalagaur Ukhane in Marathi: मंगळागौर पूजेच्यावेळी नाव घेण्याचा आग्रह पूर्ण करण्यासाठी घ्या 'हे' खास मराठी उखाणे

आम्ही तुमच्यासाठी काही खास मराठी उखाणे घेऊन आलो आहोत. तुम्ही हे उखाणे घेऊन सर्वांपेक्षा हटके पद्धतीने तुमच्या मैत्रिणींचा हट्ट पूरवू शकता.

Mangalagaur (Photo Credits: YouTube)

Mangalagaur Ukhane in Marathi: मंगळा गौरी व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी पाळले जाते. हिंदू धर्मात या व्रताचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की मंगळा गौरी व्रताचे पालन केल्याने अखंड विवाह, संतती, संततीचे रक्षण आणि कुटुंबात सुख-समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात. अनेक भाविक श्रावण महिन्यात सोळा आठवडे उपवास करण्याचे व्रत घेतात किंवा श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हा उपवास करतात. उत्तम वैवाहिक जीवनासाठी महिला हे व्रत ठेवतात.

हिंदू धर्मात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. तसेच प्रत्येक सणाचे वेगळे वैशिष्ट्य असते. त्याचप्रमाणे मंगळागौरी उत्सावादरम्यान सुविसीनी महिलांनी उखाणे घेण्याची प्रथा आहे. मंगळागौरी निमित्त तुम्ही देखील खास उखाणे घेऊ शकता. आम्ही तुमच्यासाठी काही खास मराठी उखाणे घेऊन आलो आहोत. तुम्ही हे उखाणे घेऊन सर्वांपेक्षा हटके पद्धतीने तुमच्या मैत्रिणींचा हट्ट पूरवू शकता. (हेही वाचा - Shravan Month 2023 in Maharashtra: यंदा 59 दिवसांचा श्रावण मास; जाणून घ्या श्रावण आणि अधिक श्रावण मासाच्या महाराष्ट्रातील तारखा काय?)

मंगळागौरीच्या दिवशी माता पार्वतीची पूजा केली जाते. गौरी हा आदिशक्ती महामायेचा अवतार असल्याची हिंदूंची श्रद्धा आहे. ती शिवाची शक्ती आहे.