AIDS Day 2023 Quotes In Marathi: जागतिक एड्स दिनानिमित्त WhatsApp Status, HD Images शेअर करून प्रियजनांनामध्ये पसरवा जनजागृती!
यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगत येतील. तुम्ही ते मोफत डाऊनलोड करू शकता.
AIDS Day 2023 Quotes In Marathi: दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जगभरात जागतिक एड्स दिन (AIDS Day 2023) साजरा केला जातो. हा असा आजार आहे ज्यावर पूर्णपणे बरा होण्यासाठी आजपर्यंत कोणतेही औषध बनलेले नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या अहवालानुसार, 2021 मध्ये जगभरात सुमारे 6,50,000 लोकांचा HIV मुळे मृत्यू झाला. भारत सरकारच्या नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (NACO) च्या अहवालानुसार, 2021 मध्ये एड्सशी संबंधित आजारांमुळे सुमारे 42 हजार लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे जगभरातील लोकांना या आजाराबाबत जागरूक करणे अत्यंत गरजेचे आहे. या उद्देशाने दरवर्षी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो.
जागतिक एड्स दिनानिमित्त WhatsApp Status, HD Images शेअर करून तुम्ही आपल्या मित्र-परिवारामध्ये जनजागृती पसरवू शकता. यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगत येतील. तुम्ही ते मोफत डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - December Vrat-Festival 2023: विवाह पंचमी, मोक्षदा एकादशी, ख्रिसमससह डिसेंबर महिन्यात साजरे होणार 'हे' प्रमुख उपवास, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस)
असुरक्षीत लैंगिक संबंधात करू नका घाई,
हा मानव जन्म पुन्हा नाही.
संयम पाळा,
एड्स टाळा
रडू नका, मरू नका,
जेव्हा एड्स जवळ येईल
तेव्हा गुड बाय म्हणा.
सुंदर व्हा! हुशार व्हा! स्टाइलिश व्हा!
पण, स्वतःला एचआयव्हीपासून वाचवा!
करा प्रतिज्ञा स्वतःशी,
दूर राहील असुरक्षित संबंधाशी.
सुरक्षेत आहे तुमची भलाई,
हीच खरी जीवनाची कमाई.
जागतिक स्तरावर जागतिक एड्स दिन साजरा करण्याची सुरुवात WHO ने 1988 मध्ये केली. त्यावेळच्या अंदाजानुसार, सुमारे 90,000 ते 1,50,000 लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह होते. 1996 पर्यंत, WHO ने जागतिक एड्स दिन संदर्भात दरवर्षी अनेक कार्यक्रम आयोजित केले. त्यानंतर युनायटेड नेशन्स एजन्सी यूएन एड्सने या जबाबदाऱ्या आपल्या हातात घेतल्या. दरवर्षी या दिवशी, संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सी, सरकार एकत्र येऊन एचआयव्हीशी संबंधित विशिष्ट थीमवर मोहीम राबवतात आणि लोकांना या आजाराबद्दल जागरूक करतात.