Shubh Vivah Muhurat 2021: नवीन वर्षात केवळ 'या' तारखेला पार पडणार लग्नसोहळा; जाणून घ्या पुढील वर्षातील लग्नाचे शुभ मुहूर्त
याशिवाय मे 2021 मध्ये यावर्षी विवाहासाठी सर्वाधिक 16 मुहूर्त असणार आहेत.
Shubh Vivah Muhurat 2021: नवीन वर्ष सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. नवीन वर्ष 2021 मध्ये लग्नाचे मुहूर्त कमी आहेत. ज्योतिष पंचागानुसार, जानेवारी महिन्यात लग्नाचा मुहूर्त अत्यंत कमी असतो. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये केवळ 18 जानेवारी हा लग्नाचा मुहूर्त असणार आहे. याशिवाय मे 2021 मध्ये यावर्षी विवाहासाठी सर्वाधिक 16 मुहूर्त असणार आहेत. वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांत, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये लग्नासाठी कोणताही शुभ काळ नाही. याशिवाय ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांमध्येदेखील लग्नाचा शुभ मुहूर्त नाही. जर तुम्ही स्वत: च्या किंवा आपल्या घरातील इतर व्यक्तीच्या विवाहाचा विचार करत असाल, तर तुम्हाला 2021 या वर्षातील शुभ विवाहाच्या तारखा जाणून घेण्यासाठी खालील माहिती नक्की उपयोगात येईल.
जानेवारी 2021 -
जानेवारी महिन्यात लग्नासाठी केवळ एकच शुभ मुहूर्त आहे. 18 जानेवारी रोजी तुम्ही विवाह करू शकता. (हेही वाचा - Shivpratap Din 2020: शिवप्रताप दिन यंदा प्रतापगडावर कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने होणार साजरा; शिवप्रेमींना गडावर येण्यास मज्जाव)
फेब्रुवारी 2021 -
फेब्रुवारीमध्ये लग्नासाठी एकही शुभ दिवस नाही.
मार्च 2021-
लग्नासाठी मार्च महिन्यामध्येदेखील कोणताही शुभ दिवस नाही.
एप्रिल 2021 -
एप्रिल महिन्यात लग्नासाठी 8 शुभ दिवस आहेत. या दिवसांत शुभ विवाह केला जाऊ शकतो. एप्रिल महिन्यातील लग्नाच्या शुभ तारखा 22, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30 अशा आहेत.
मे 2021 -
मे महिन्यात शुभ विवाहासाठी अनेक मुहूर्त आहेत. या महिन्यात लग्नासाठी 16 शुभ दिवस आहेत. मे महिन्यात शुभ विवाहासाठी 1, 2, 7, 8, 9, 13, 14, 21, 22, 23, 24, 25, 26, 28, 29 आणि 30 या तारखा आहेत.
जून 2021 -
यावर्षी जूनमध्ये एकूण 8 शुभ दिवस आहेत. ज्यात विवाह होऊ शकतात. महिन्यातील 3, 4, 5, 16, 20, 22, 23 आणि 24 रोजी शुभ विवाह पार पाडला जाऊ शकतो.
जुलै 2021 -
जुलैमध्ये लग्नासाठी फक्त 5 शुभ दिवस आहेत. 1, 2, 7, 13 आणि 15 जुलै रोजी विवाहसोहळा आयोजित केला जाऊ शकतो.
ऑगस्ट 2021 -
या महिन्यात लग्नासाठी कोणताही शुभ मुहूर्त नाही.
सप्टेंबर 2021 -
या महिन्यातदेखील लग्नासाठी कोणताही शुभ दिवस नाही.
ऑक्टोबर 2021 -
ऑक्टोबरमध्येही लग्नासाठी एकाही शुभ दिवस नाही.
नोव्हेंबर 2021 -
3 महिन्यांच्या प्रदीर्घ अंतरानंतर नोव्हेंबर महिन्यात लग्नासाठी 7 शुभ दिवस आहेत. या महिन्यातील 15, 16, 20, 21, 28, 29 आणि 30 रोजी लग्नसोहळा पार पाडता येऊ शकतो.
डिसेंबर 2021-
वर्ष 2021 च्या शेवटच्या महिन्यात लग्नासाठी 6 शुभ दिवस आहेत. 1, 2, 6, 7, 11 आणि 13 डिसेंबर रोजी शुभ विवाह होऊ शकतात. अशा प्रकारे पुढील वर्षातील सर्व महिन्यातील शुभ विवाहाच्या तारखा पाहून तुम्ही आपल्या किंवा आपल्या नातेवाईकाच्या लग्नाची तारीख ठरवू शकता.