Atharvashirsha & Ganpati Stotram: गणेश चतुर्थी निमित्त श्री गणपती अथर्वशीर्ष, स्तोत्र, गायत्री मंंत्राने करा दिवसाची मंंगलमय सुरुवात (Watch Video)
गणेशाची स्तुती करणारे श्री गणपती अथर्वशीर्ष (Atharvashrisha) आणि गणपती स्तोत्र (Ganpati Stotram) गायत्री मंंत्र (Gayatri Mantra), ऐकुन आपण आजचा दिवस आणखीन मंंगलमय रित्या सुरु करु शकता.
Ganesh Chaturthi 2020: आज 22 ऑगस्ट रोजी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला देशभरात गणेश चतुर्थी साजरी केली जात आहे. घरोघरी, सार्वजनिक मंडळांत आज गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली जाईल. त्यानंतर आरती करुन बाप्पा विराजमान होतील. वर्षभर देशविदेशातील गणेश भक्त या खास दिवसाची वाट पाहत असतात मात्र यंंदा कोरोनाच्या संकटामुळे (Coronavirus) सर्वच सणांंच्या वेळी निराशा झाली आहे, गणेशोत्सव (Ganeshotsav) दरम्यान सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने सरकार तर्फे दिलेल्या सुचनांंचे पालन करत अगदी साध्या पद्धतीने सण साजरा केला जाणार आहे, मात्र स्वरुप साधं असलं तरी उत्साह कमी करण्याचे कारण नाही, मंडळात नाही तर काय झालं निदान घरच्या देव्हार्यातील बाप्पासमोर हात जोडुन तुम्ही सण साजरा करुच शकता. यावेळी आणखीन थोडा उत्साह वाढवण्यासाठी गणेशाची स्तुती करणारे श्री गणपती अथर्वशीर्ष (Atharvashrisha) आणि गणपती स्तोत्र (Ganpati Stotram) गायत्री मंंत्र (Gayatri Mantra), ऐकुन आपण आजचा दिवस आणखीन मंंगलमय रित्या सुरु करु शकता. (गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा गणेश चतुर्थी 2020 चा मुहूर्त, पुजा विधी घ्या जाणून)
या स्तोत्रांमुळे पवित्र झालेलंं वातावरण सकारत्मक शक्ती निर्माण करते असे म्हणतात, त्यामुळे आपल्यापैकी अनेकांच्या घरी बाप्पांंचे आगमन होणार असेल तर त्यावेळेस सुद्धा ही स्तोत्र आवर्जुन ऐका. गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा देणारे मराठी Messages, Whatsapp Status वर शेअर करत साजरा करुयात गणेशोत्सव
श्री गणपती अथर्वशीर्ष
गणपती स्तोत्र
दरम्यान, आज सकाळपासुन देशातील विविध शहरात बाप्पांचे आगमन झाले आहे. पुढील 11 दिवस हाच उत्साह कायम राहिल यात शंका नाही मात्र त्यात कुठेही नियमांंचे उल्लंघन करु नये यासाठी सरकारी यंंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.