Shravan Masarambh 2026 Wishes: श्रावण मासारंभाच्या शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Status, Messages, Quotes!

श्रावण मासारंभाच्या शुभेच्छा, Greetings, WhatsApp Status, Wishes, Messages शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता. अशा या मंगलमय श्रावण महिन्याच्या आगमनाच्या शुभेच्छा देत तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळींसोबत श्रावण महिन्याची सुरूवात थोडी खास करा.

श्रावण महिना म्हणजे व्रत वैकल्यांची, सणवारांची रेलचेल असणारा महिना. हिंदू धर्मीयांसाठी याचमुळे हा महिना अत्यंत पवित्र असतो. भगवान शंकरांच्या उपासनेसाठीही हा महिना खास आहे. त्यामुळे पावसाळी वातावरणामध्ये सणांची धामधूम घेऊन येणारा हा महिना आपोआपच त्याच्यासोबत घरा-घरात आणि निसर्गात चैतन्य घेऊन येतो. मग अशा या मंगलमय श्रावण महिन्याच्या आगमनाच्या शुभेच्छा देत तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळींसोबत श्रावण महिन्याची सुरूवात थोडी खास करा. श्रावण मासारंभाच्या शुभेच्छा, Greetings, WhatsApp Status, Wishes, Messages शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता.

महाराष्ट्रात अमांत चांद्र कॅलेंडर पाळलं जात असल्याने उत्तर भारताच्या तुलनेत महाराष्ट्रात 15 दिवसांनंतर श्रावण मासाची सुरूवात होते. यंदा महाराष्ट्रात 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2026 दरम्यान श्रावणमास असणार आहे. नक्की वाचा: Shravan Somvar Vrat 2026 Dates: 13 ऑगस्ट पासून श्रावणमासारंभ; पहा श्रावणी सोमवार व्रत तारखा. 

श्रावण मासारंभाच्या शुभेच्छा

पवित्र श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
या श्रावणात तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी
आणि आनंद येवो.
हर हर महादेव!
श्रावणमासारंभाच्या शुभेच्छा
आकाशात इंद्रधनुष्य,
धरतीवर हिरवळ
आणि मनात भक्तीभाव
घेऊन आला श्रावण...
श्रावणमासारंभाच्या शुभेच्छा
सोमवारचे उपवास,
शिवशंकराची पूजा आणि निसर्गाचे सुंदर रूप
घेऊन आलेला श्रावण महिना
तुमच्यासाठी मंगलमय ठरो.
श्रावणाच्या शुभेच्छा!
श्रावणमासारंभाच्या शुभेच्छा
हिरवाईने नटलेली धरती,
कोसळणाऱ्या सरी आणि मनाला भावणारा गारवा
घेऊन येतो श्रावण...
आपणा सर्वांना श्रावण मासाच्या शुभेच्छा!
श्रावणमासारंभाच्या शुभेच्छा
भोळ्या शंकराच्या कृपेने
या श्रावण महिन्यात
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.
श्रावण मासारंभाच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रावणमासारंभाच्या शुभेच्छा

समुद्रमंथनाच्या वेळी भगवान शंकरांनी हलाहल विष प्राशन केले आणि नीलकंठ झाले, ही घटना श्रावण महिन्यातच घडली असे मानले जाते. म्हणून या महिन्यात शिवभक्ती, उपवास आणि पूजा-अर्चा यांना विशेष महत्त्व आहे.श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शिवमूठ अर्पण केली जाते. नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी (कृष्ण जन्माष्टमी),पिठोरी अमावस्या सारखे महत्त्वाचे सण साजरे केले जातात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement