Shivrajyabhishek Din 2020 Messages: शिवराज्याभिषेक दिन निमित्त मराठमोळ्या शुभेच्छा, Wishes, HD Images, Quotes च्या माध्यमातून शेअर करून शिवरायांना करा मानाचा मुजरा!
यंदा तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) शिवराज्याभिषेकोत्सव दिन साजरा करणार असाल तर तो गुरूवार 4 जून दिवशी आहे.
Shivrajyabhishek Din 2020 Marathi Messages: शिवजयंतीचा जसा वाद आहे तसाच शिवभक्तांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या (Shivrajyabhishek Din) सोहळ्याबद्दलही दोन गट आहे. काहींच्या मते तो 6 जून दिवशी ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे साजरा केला जातो. तर काहींच्या मते तो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी साजरा जातो. मग यंदा तुम्ही देखील यंदा तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) शिवराज्याभिषेकोत्सव दिन साजरा करणार असाल तर तो गुरूवार 4 जून दिवशी होता. या दिवशी अनेक शिवभक्त रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमन करतात. हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ बांधणार्या शिवरायांना या दिवशी 'शिवछत्रपती' होण्याचा सन्मान मिळाला. त्यामुळे शिवभक्त मोठ्या जल्लोषात शिवजयंती प्रमाणे शिवराज्याभिषेक दिन देखील साजरा करतात. यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या प्रमाणात साजरा न करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. मात्र सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे तुम्ही घरबसल्या मराठमोळी शुभेच्छापत्र, मेसेज (Messages), शुभेच्छा, ग्रिटिंग्स (Greetings) व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबूक स्टेट्स (Facebook Status), मेसेंजरच्या माध्यमातून शेअर करून डिजिटल मीडियामध्ये यंदाचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करू शकता. त्यासाठी लेटेस्टली टीमने बनवलेली ही खास शुभेच्छापत्र तुम्ही नक्कीच शेअर करु शकता. Shivrajyabhishek Sohala 2020 Messages: शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त मराठी संदेश, Wishes, Greetings, Whatsapp Stickers, Images च्या माध्यमातून Facebook, WhatsApp वर शेअर करून शिवरायांना द्या मानवंदना!
शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 दिवशी झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांनी शिवरायांचा हा राज्याभिषेक केला. यावेळी शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन मुख्य विधी पार पडले. या सोहळ्यात 32 मण सोन्याचे भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. त्यांना सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मंत्रांचे उच्चारण केले आणि प्रजेने महाराजाना आशीर्वाद दिला.Shivrajyabhishek Sohala: शिवराज्याभिषेक सोहळा यंदा तिथीनुसार 4 जून ला होणार साजरा; जाणून घ्या 'या' सुवर्ण मुहूर्ताचा इतिहास.
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराज यांना
शिवराज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा!
Shivrajyabhishek Din 2020 | File Photo
सिंहासनी होतो आरूढ गर्व मराठ्यांचा
मुजरा तुजला आमचा हे प्रभो शिवाजी राजा
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!
एक होऊनी करू उत्सव
शिवराज्याभिषेक दिनाचा
एक विचाराने चालवू वारसा
अवघ्या महाराष्ट्राचा
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त
छत्रपती शिवाजी महाराजांना
मानाचा मुजरा!
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!
दरवर्षी शिवराज्यभिषेक तिथी आणि तारखेनुसार दोन वेगळ्या दिवशी पार पडतो. यंदा सुद्धा तिथीनुसार 4 जून रोजी तर तारखेनुसार दरवर्षीप्रमाणे 6 जून रोजी शिवराज्यभिषेक साजरा केला जाणार आहे. शिवभक्तांनी मात्र हा सोहळा घरात राहून शिवरायांना मनातून मुजरा करत साजरा कारवाया असे आवाहन छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी ट्वीट करत केले होते.