Shivaji Maharaj Jayanti 2019: विश्वविक्रमी रांगोळी, 13 फुटी जिरेटोप सह शिवजयंती निमित्त राज्यात विविध ठिकाणी साकारल्या भव्यदिव्य कलाकृती! (Photos)

त्यांची जयंती देशभरात अगदी उत्साहात साजरी होत आहे.

Archived, edited, representative images | (Photo Credit: File Photo/ Twitter)

Shiv Jayanti 2019: जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा आज जन्मदिवस. त्यांची जयंती देशभरात अगदी उत्साहात साजरी होत आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन शिवजयंतीचा सोहळा साजरा केला जाईल. यातच राज्यातील विविध ठिकाणी अनोख्या पद्धतीने शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जात आहे. भव्य दिव्य रांगोळ्या, जिरेटोप साकारून तर शिवाजी महाराजांच्या फोटोत पेरणी करुन त्यांना अभिवादन केले जात आहे. शिवजयंती हा उत्सव 19 फेब्रुवारीला साजरा करण्याची सुरूवात कशी आणि कधी झाली?

सांगली येथील शिवाजी महाराज स्टेडिअमवर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची भव्य दिव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. सव्वा लाख चौरस फुटाची ही विश्वविक्रमी रांगोळी असून  100 कला शिक्षकांनी ती साकारली आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्वाच्या लढाया आणि प्रसंग

नाशिक येथील छत्रपती सेनेने भव्य असा जिरेटोप साकारला आहे. 13 फुटी जिरेटोपाची वंडर बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे. हा जिरेटोप बनवण्यासाठी 15 दिवस लागले असून 140 किलो रिक्रोन, कापूस, 120 मीटर कापड, 50 बांबू आणि 75 चटया वापरण्यात आलेल्या आहेत. विविध जातीच्या लोकांना एकत्र आणून शिवाजी महाराजांचे विचार जगापर्यंत पोहचवण्याचा छत्रपती सेनेचा विचार आहे. शिवजयंती 2019 चा मुहूर्त साधत संभाजी उद्यान येथे तरूणाने बसवला संभाजी महाराजांचा पुतळा, पालिकेने पुतळा हटवल्यास महाराष्ट्र पेटेल असा इशारा

तर निलंगा येथे 7 एकर जमिनीत छत्रपती शिवाजी महाराज यांची पेरणीतून प्रतिमा साकारली आहे.

शिवाजी महाराजांचा गुणांचा, पराक्रमाचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी हे असे उपक्रम नक्कीच प्रेरणादायी ठरतात.