Shiv Jayanti Tithi 2023 Wishes in Marathi: तिथीनुसार शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास WhatsApp Status, Facebook Messages!
19 फेब्रुवारी 1630 ही तारीख फाल्गुन वद्य तृतीया असल्याने या दिवशी काही शिवभक्त राजांना अवश्य मानाचा मुजरा करत हा दिवस साजरा करतात.
महाराष्ट्रामध्ये 19 फेब्रुवारी दिवशी तारखेनुसार शिवजयंती साजरी केल्यानंतर तिथीनुसार ही शिवजयंती (Shiv Jaynati) फाल्गुन कृष्ण तृतीयेला देखील काही शिवभक्त साजरी करतात. यंदा हा तिथीनुसार शिवजयंतीचा दिवस 10 मार्च आहे. शिवभक्तांमध्ये तारखेनुसार की तिथीनुसार शिवजयंती साजरी करायची यावरून मतमतांतरं आहेत. दरम्यान शासकीय तारखेनुसार, या दिवसाचं सेलिब्रेशन झाल्यानंतर आता तिथीनुसार हा दिवस साजरा करण्यासाठी तुम्ही शिवभक्तांसोबत हे मराठमोळे मेसेज WhatsApp Status, Messages, Wishes, Greetings द्वारा शेअर करण्यासाठी ही शुभेच्छापत्र शेअर करू शकता.
महाराष्ट्र सरकारने एक समिती नेमली होती, त्यांनी दिलेल्या अहवालानंतर शासकीय दृष्ट्या 19 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी महात्मा फुलेंनी 1870 साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती. राज्यात अनेक ठिकाणी तिथीनुसारही महाराजांची जयंती साजरी करण्याची पद्धत आहे. नक्की वाचा: Shiv Jayanti Tithi Nusar 2023 Date: तिथीनुसार शिवजयंती कधी साजरी केली जाईल? जाणून घ्या,तारीख .
शिवजयंतीच्या शुभेच्छा
ज्या मातीत जन्मलो तिचा
रंग सावळा आहे.
सह्याद्री असो वा हिमालय,
छाती ठोक सांगतो
मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!
निधड्या छातीचा, दणकट कणांचा
मराठी मनांचा, भारत भूमीचा एकच राजा
शिवरायांना आमचा मानाचा मुजरा
सार्या शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!
ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून
अभिमानाने भरून जाई छाती
प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनात
वसतात राजे शिवछत्रपती
अशा रतयेच्या राजास मानाचा मुजरा
स्वराज्यासाठी ज्याने वेचले आपले आयुष्य
पूर्ण स्वराज्य हे एकच होते ज्याचे लक्ष्य
स्वराज्याचे स्वप्न केले ज्यांनी साकार
करु आज शिवछत्रपतींचा जयजयकार
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!
स्त्रित्रांचा जो ठेवितो आदर,
ज्यास सहन न होई मराठ्यांचा अनादर
त्या प्रत्येकामध्ये शिवभक्त दिसे
ज्याच्या मनात शिवछत्रपती वसे
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा!
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जिजाऊंच्या पोटी पुण्याच्या शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख फाल्गुन वद्य तृतीया असल्याने या दिवशी काही शिवभक्त राजांना अवश्य मानाचा मुजरा करत हा दिवस साजरा करतात. मुघल आक्रमणांसमोर मूठभर मावळे सोबतीला घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. बघता बघता त्यांनी मराठा साम्राज्यावर भगवा कायम फडकवत ठेवला. या मध्ये कोणत्याही जाती, धर्माला हात न लावला, सामान्य जनतेच्या देठाचंही नुकसान न करता हिंदवी स्वराज्याचा दबदबा वाढवला. त्यामुळे 'जनतेचा राजा' म्हणून ओळख असलेला हा राजा आजही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे.