Shiv Jayanti 2024 Tithi Date: शिवजयंती आज तारखेनुसार पण पहा तिथीनुसार कधी होणार साजरी!

१९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली.

Ch. Shivaji Maharaj | Twitter

शिवजयंतीचा (Shiv Jayanti) सोहळा हा प्रत्येक शिवभक्तासाठी खास असतो. महाराष्ट्रात राज्य सरकार कडून 19 फेब्रुवारी दिवशी दरवर्षी तारखेनुसार शिवजयंती साजरी केली जाते. या निमित्ताने राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते. पण काही शिवभक्त तिथीनुसार देखील शिवजयंती साजरी करतात. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) जन्म फाल्गुन कृष्ण तृतीया दिवशीचा असल्याने यंदा तिथीनुसार शिवजयंतीचा सोहळा 28 मार्च 2024 दिवशी साजरा केला जाणार आहे. अनेक शिवभक्त आजच्या प्रमाणे तिथीनुसार शिवाजयंतीला देखील शिवनेरी सह राजांच्या अनेक गडकिल्ल्यांवर जाऊन आदरांजली अर्पण करतात.

शिवजयंती तारखेनुसार साजरी करावी की तिथी नुसार याबद्दल अनेक मतमतांतर आहेत. महाराष्ट्र सरकारने 2001साली फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. पण तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्यास सुरूवात  केली. महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया दिवशी देखील शिवजयंती साजरी करतात. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती.  नक्की वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj Quotes: शिवजयंती च्या निमित्ताने पुढच्या पिढीपर्यंत शिवरायांचे सकारात्मक विचार WhatsApp Status, Facebook Messages द्वारा नक्की करा शेअर! 

महाराष्ट्रातील शिवजयंतीचं सेलिब्रेशन

दरम्यान महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करण्याची सुरूवात  1869 साली झाली.  महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्व प्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला आणि शिवजयंती साजरी करण्यास सुरूवात केली असे सांगितले जाते. नंतर  1895 मधे लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव म्हणून सुरू केला. जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम जागवावं आणि त्याचा वापर ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी करावा असा हेतू यामागे होता.

शिवजयंती साजरी करण्यामागचा उद्देश असा की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावेत. त्यानुसार महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म दिवस अर्थात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.