Shiv Jayanti 2019: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या खास आवाजात छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा; पाहा व्हिडिओ
त्यामुळे अनेकांनी ही ध्वनिचित्रफीत आपल्या ट्विटर हॅंडलवर शेअर केली आहे. तर काहींनी या ध्वनिचित्रफीतीला लाईक करुन प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एक मिनिटे 10 सेकंद इतक्या अवधीची असलेली ही ध्वनिचित्रफीत राज ठाकरे यांनी शनिवारी (23 मार्च 2019) सकाळी ट्विटरच्या माध्यमातून सार्वजनिक केली.
Shiv Jayanti 2019: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त आपल्या खास आवाजात मनसेतर्फे मानाचा मुजरा केला आहे. छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा करण्यासाठी राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवर (Raj Thackeray Twitter) एक ध्वनिचित्रफीत पोस्ट केली आहे.
'आम्ही का जगायचं याचा मंत्र शिवाजी महाराजांनी दिला'
राज ठाकरे यांनी ट्विटर हॅंडलवर शेअर केलेल्या ध्वनिचित्रफीतीसोबत एक संदेशही लिहिला आहे. या संदेशात ते म्हणतात 'ज्या महापुरुषाने आम्हाला आमची ओळख करून दिली आणि आम्ही का जगायचं याचा मंत्र दिला त्या आपल्या सर्वांच्या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मानाचा मुजरा'
राज ठाकरे ट्विट
एक मिनिटे 10 सेकंद इतक्या अवधीची असलेली ही ध्वनिचित्रफीत राज ठाकरे यांनी शनिवारी (23 मार्च 2019) सकाळी ट्विटरच्या माध्यमातून सार्वजनिक केली. विशेष म्हणजे या ध्वनिचित्रफीतीला स्वत: राज ठाकरे यांनी आवाज दिला आहे.
शिवजयंतीच्या शुभेच्छा द्या व्हिडिओच्या माध्यमातून
राज ठाकरे यांनी ट्विटरवर शेअर केलेली ही ध्वनिचित्रफीत अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यामुळे अनेकांनी ही ध्वनिचित्रफीत आपल्या ट्विटर हॅंडलवर शेअर केली आहे. तर काहींनी या ध्वनिचित्रफीतीला लाईक करुन प्रतिक्रियाही दिल्या आहेत.