Shirdi Sai Baba Guru Purnima 2019: श्री क्षेत्र शिर्डी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त 15 ते 17 जुलै दरम्यान रंगणार श्री गुरुपौर्णिमा उत्सव, साईभक्तांनी येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असते. दरवर्षी प्रमाणे यंदाही शिर्डीमध्ये श्री गुरु पौर्णिमा 2019 (Shri Guru Purnima Utsav 2019) उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Shirdi Sai Baba (Photo Credits: www.sai.org.in)

Shirdi Sai Baba Guru Purnima Festival 2019 : गुरुंना वंदन करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आषाढ पौर्णिमेला येणा-या गुरुपौर्णिमे निमित्त लाखो भाविक साई चरणी लीन होण्यासाठी शिर्डीला येतात. गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असते. दरवर्षी प्रमाणे यंदाही शिर्डीमध्ये श्री गुरुपौर्णिमा 2019 (Shri Guru Purnima Utsav 2019) उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. साईभक्ताला त्याच्या लाडक्या गुरुचे साईंचे दर्शन व्हावे यासाठी साई संस्थानाने विशेष अशी तयारी केली आहे.

दरवर्षी जगभरातून लाखो भाविक शिर्डीला साईंच्या दर्शनाला येतात. त्यात गुरुपौर्णिमेचा दिवस हा त्यांच्यासाठी खूपच खास असतो. म्हणूनच हा सलग 3 दिवस हा सोहळा साजरा केला जातो. यंदा हा सोहळा 15 ते 17 जुलै असा रंगणार आहे. अगदी पहाटे काकड आरती पासून रात्री शेजारती पर्यंत हा कार्यक्रम असणार आहे. येथे पाहा कार्यक्रमाचे संपुर्ण वेळापत्रक-

Shri Sai Baba Guru Purnima २०१९ (Photo Credits: Shri Sai Baba Sansthan Shirdi)

तसेच यावर्षी चंद्रग्रहण असल्याने शेजारती नंतर मंदिर बंद ठेवले जाणार आहे. दरवर्षी शेजारती नंतर मंदिर दर्शनासाठी उघडले ठेवले जाते. मात्र यंदा प्रथमच या दिवशी चंद्रग्रहण आल्यामुळे हे श्री क्षेत्र शिर्डी मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा- Guru Purnima 2019 Messages: गुरू पौर्णिमा निमित्त हे खास संदेश, शुभेच्छापत्रं, Facebook आणि WhatsApp Messages च्या माध्यमातून शेअर करुन व्यक्त करा गुरू बद्दल कृतज्ञता

3 दिवस असणा-या आणि डोळ्यांचे पारण फेडणा-या या सोहळ्याला आज पहाटेपासून सुरुवात झाली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif