IPL Auction 2025 Live

Shaheed Diwas 2024 Messages: शहीद दिनानिमित्त WhatsApp Stickers और HD Wallpapers च्या माध्यमातून वीरांच्या स्मृतीस करा विनम्र अभिवादन

शहीद दिन भारतात अनेक तारखांना साजरा केला जातो. 23 मार्च हा दिवस म्हणून स्मरणात ठेवला जातो जेव्हा तीन शूर स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांना इंग्रजांनी फाशी दिली होती.पाहा खास शुभेच्छा संदेश

Shaheed Diwas 2024 Messages

Shaheed Diwas 2024 Messages: 23 मार्च हा दिवस भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू या तीन स्वातंत्र्यसैनिकांचा हुतात्मा दिवस आहे. शहीद दिन भारतात अनेक तारखांना साजरा केला जातो. 23 मार्च हा दिवस म्हणून स्मरणात ठेवला जातो जेव्हा तीन शूर स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांना इंग्रजांनी फाशी दिली होती. तसेच 30 जानेवारी हा महात्मा गांधींच्या स्मरणार्थ शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाबमधील लायलपूर येथे झाला. भगतसिंग हे त्यांचे सोबती राजगुरू, सुखदेव, आझाद आणि गोपाल यांच्यासोबत लाला लजपत राय यांच्या हत्येसाठी लढले. भगतसिंग त्यांच्या धाडसी कारनाम्यामुळे तरुणांसाठी प्रेरणास्थान बनले. 8 एप्रिल 1929 रोजी "इन्कलाब झिंदाबाद" च्या घोषणा देत त्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी मध्यवर्ती विधानसभेवर बॉम्ब फेकले आणि त्याबद्दल त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना 23 मार्च 1931 रोजी लाहोर तुरुंगात फाशी देण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर सतलज नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरवर्षी हुतात्मा दिनी, सर्वजण स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करतात आणि त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात. शहीद दिनानिमित्त तुम्ही व्हॉट्सॲप, फेसबुक स्टिकर्सच्या माध्यमातून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करू शकता.

पाहा खास संदेश:

Shaheed Diwas 2024 Messages
Shaheed Diwas 2024 Messages
Shaheed Diwas 2024 Messages
Shaheed Diwas 2024 Messages
Shaheed Diwas 2024 Messages
Shaheed Diwas 2024 Messages

 भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली, त्यामुळे या अमर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 23 मार्च रोजी शहीद दिन साजरा केला जातो. दरम्यान, तुम्ही हे खास संदेश पाठवून या अमर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ तुम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहू शकता.