World Enviorment Day 2025 Quotes: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त Slogan, Greetings, WhatsApp Status द्वारे द्या खास शुभेच्छा!

लोकांना पर्यावरणाबद्दल जागरूक करणे आणि निसर्ग आणि पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगण्याच्या उद्देशाने दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिवशी सोशल मीडियावर खालील खास स्लोगन, कोट्स शेअर करून तुम्ही जागतिक पर्यावरण दिन साजरा करू शकता.

World Enviorment Day 2025 Quotes: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त Slogan, Greetings, WhatsApp Status द्वारे द्या खास शुभेच्छा!
World Enviorment Day 2025 Quotes (फोटो सौजन्य - File Image)

World Enviorment Day 2025 Quotes: दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन (World Enviorment Day 2025) म्हणून साजरा केला जातो. भारतासह जगभरात प्रदूषण वेगाने पसरत आहे. त्यामुळे आपल्या निसर्गाचे खूप नुकसान होत आहे. निसर्गाला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिवशी लोकांना निसर्गाची जाणीव करून दिली जाते आणि प्रदूषणापासून वाचवण्यासाठी प्रेरित केले जाते. पर्यावरण म्हणजे आपण ज्या नैसर्गिक वातावरणात राहतो तो संपूर्ण परिसर. त्यात आपल्या सभोवतालचे सर्व सजीव आणि निर्जीव घटक जसे की हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी आणि इतर जीव यांचा समावेश होतो.

नैसर्गिक संसाधनांचा वापर आणि मानवी जीवनशैलीसाठी पर्यावरणाचा अनेकदा गैरवापर केला जातो. त्यामुळे पर्यावरण प्रदूषित होत आहे. प्रदूषित वातावरणाचा जीवनासाठी आवश्यक असलेल्या घटकांवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, लोकांना पर्यावरणाबद्दल जागरूक करणे आणि निसर्ग आणि पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगण्याच्या उद्देशाने दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिवशी सोशल मीडियावर खालील खास स्लोगन, कोट्स शेअर करून तुम्ही जागतिक पर्यावरण दिन साजरा करू शकता.

दारी वृक्षाचा पहारा

पशुपक्ष्यांना देऊ आसरा

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!

World Enviorment Day 2025 Quotes 1 (फोटो सौजन्य - File Image)

उन्हातान्हात हवी असेल सावली

तर वृक्ष लावा पावलो पावली

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!

World Enviorment Day 2025 Quotes 2 (फोटो सौजन्य - File Image)

वसुंधरेचे हिरवे लेणे,

पर्यावरण आणि वृक्षांना वाचवणे

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!

World Enviorment Day 2025 Quotes 3 (फोटो सौजन्य - File Image)

प्रदूषण करा कमी,

सुंदर भविष्याची देईल निसर्ग हमी

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!

World Enviorment Day 2025 Quotes 4 (फोटो सौजन्य - File Image)

झाडे लावा झाडे जगवा,

भविष्य वाचवा जीवन फुलवा

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!

World Enviorment Day 2025 Quotes 5 (फोटो सौजन्य - File Image)

दरवर्षी जून महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या विशेष दिवसाचे आयोजन करण्यासाठी एक तारीख निश्चित करण्यात आली आहे. भारतासह जगभरात 5 जून रोजी पर्यावरण दिन साजरा केला जातो. या निमित्ताने विविध देश आपल्या नागरिकांना पर्यावरणाबद्दल जागरूक करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रम आयोजित करतात.

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2025 11:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).