Savitribai Phule Jayanti 2020: 'माता सावित्रीबाई गीत' सहित 'या' 5 गाण्यांमधून जाणून घ्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिकेच्या कार्याची महती
भारताची पहिली महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांची आज 188 वी जयंती निमित्त आपण आज त्यांची महती सांगणाऱ्या गाण्याची एक झलक पाहणार आहोत
भारताची पहिली महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांची आज 188 वी जयंती (Savitribai Phule Jayanti). सावित्रीबाई (Savitribai Phule) यांचा जन्म 3 जानेवरी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला. भारतीय महिलेला शिक्षणाची साथ मिळावी यासाठी आता सुरु असणाऱ्या सर्व प्रयत्नांचा उगमस्रोत म्ह्णून सावित्रीबाई यांच्या कडे पाहिले जाते. अलीकडे सुरु असणाऱ्या Feminisim चळवळीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या स्त्रीने, केवळ शिक्षणच नव्हे तर सामाजिक आयुष्यात देखील महिलेला बरोबरीचे स्थान मिळावे यासाठी मेहनत घेतली. समाजकंटकांकडून प्रसंगी अपमान सहन करताना त्यांनी कधीच आपल्या चळवळीचा हेतू आणि त्या पूर्तीसाठीचे ध्येय डगमगू दिले नाही. अश्या कर्तबगार स्त्रीचे गुणगान गाणाऱ्या आणि त्यांच्या महतीचे वर्णन करणाऱ्या काही खास ओळी काही लेखकांनी लिहून ठेवल्या आहेत, सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आपण आज अशाच काही गीतांची झलक पाहणार आहोत.
सावित्रीबाई फुले या तळागाळातील जनतेचे प्रतिनिधित्व होत्या, त्यामुळे त्यांच्यावरील गीते सुद्धा भाषेच्या, व्याकरणाच्या पलीकडे आणि भावनांच्या नजरेने बघितल्यास तुम्हाला नक्की भावतील.. चला तर मग पाहुयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंती विशेष गीते...
माता सावित्रीबाई गीत
सावित्री फुलेवानी तुम्ही व्हावे
पेटती मशाल साऊ
सावित्रीबाई नसती तर
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. आपल्या घरासाठी, स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. या सर्वांचे श्रेय हे फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे. अशा या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या 188 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.