Sant Tukaram Maharaj Jayanti 2024: संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Messages द्वारा देण्यासाठी खास शुभेच्छापत्रं
आज 14 फेब्रुवारी दिवशी माघी पंचमीचा दिवस हा संत तुकाराम महाराज यांचा जन्मदिन (Sant Tukaram Maharaj Jayanti) आहे.
'जगद्गुरू' संत तुकाराम (Sant Tukaram Maharaj) हे 17 व्या शतकातील वारकरी संत आणि कवी होते. आपल्या रचनांमधून त्यांनी समाजाचे प्रबोधन केले. 'विठोबा' हे आराध्य दैवत असलेल्या संत तुकारामांचा जन्म माघ शुद्ध पंचमी दिवशी झाला. आज 14 फेब्रुवारी दिवशी माघी पंचमीचा दिवस हा संत तुकाराम महाराज यांचा जन्मदिन (Sant Tukaram Maharaj Jayanti) आहे. ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम हे संत तुकारामांनी केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्माचा प्रसार करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.
समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून समाजाला नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या भूमीतील या संताला आज जन्मदिनी अभिवादन करण्यासाठी खास शुभेच्छापत्रं!
संत तुकाराम महाराज जयंती
फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे सांगितले जाते त्यामुळे हा दिवस 'तुकाराम बीज' म्हणून ओळखला जातो. जगाचा संसार सुरळीत चालवा यासाठी त्यांनी अभंगांद्वारे मानवाला व एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन समाजाच्या दृष्टीने मौलिक ठरले. आजही 21 व्या शतकात त्यांचे अभंग, विचार काळाला अनुरूप ठरणारे आहेत.