Sant Dnyaneshwar Sanjeevan Samadhi Sohala 2023: संत ज्ञानेश्वर संजीवन सोहळ्याच्या शुभेच्छा देणारी WhatsApp Status, Greetings, Quotes!

त्यांची रचना देखील ज्ञानेश्वर महाराजांची आहे.

संजीवन समाधी सोहळा । File Image

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा (Sant Dnyaneshwar Sanjeevan Samadhi Sohala) आज (11 डिसेंबर) साजरा केला जात आहे. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी समाधी घेतलेल्या संत ज्ञानेश्वर (Sant Dnyaneshwar) यांचा संजीवन समाधी सोहळा हा कार्तिक वद्य त्रयोदशी दिवशी पाळला जातो. या दिवसानिमित्त आळंदीच्या संत ज्ञानेश्वरांच्या समाधीस्थळी अनेक भाविक, वारकरी मोठी गर्दी करतात. मग अशा या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, आप्तेष्टांना देण्यासाठी डिजिटल माध्यमांमध्ये लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली ही खास शुभेच्छापत्रं, Facebook Messages, WhatsApp Status, Images, Quotes तुम्ही नक्की शेअर करू शकता. या निमित्ताने ज्ञानोबा माऊलींप्रति तुमची कृतज्ञता देखील व्यक्त करू शकाल.

संत ज्ञानेश्वर समाधी सोहळा हा श्री गुरु हैबत बाबा यांच्या समाधी सोहळ्यापासून सुरू होतो.कार्तिकी अष्टमीला संजीव समाधी सोहळ्याला सुरुवात होते. कार्तिक अमावस्येपर्यंत या सोहळ्यात विविध कार्यक्रमांची रेलचेल असते.

संत ज्ञानेश्वर यांचा संजीवन समाधी सोहळा

संजीवन समाधी सोहळा । File Image

संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा

निमित्त माऊलींना विनम्र नमन!

संजीवन समाधी सोहळा । File Image

संत ज्ञानेश्वर माऊलींना कोटी कोटी प्रणाम

संजीवन समाधी सोहळा । File Image

इंद्रायणी काठी देवाची आळंदी

लागली समाधी  ज्ञानेशाची

संजीवन समाधी सोहळा । File Image

येथ म्हणे श्रीविश्वेशरावो,

हा होईल दानपसावो।

येणें वरें ज्ञानदेवो, सुखिया झाला।।

संजीवन समाधी सोहळा । File Image

ज्ञानदेव बैसले समाधी

पुढे अजाण वृक्षनिधी

वामभागी पिंपळ आधी

सुवर्णाचा शोभत

वयाच्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथांची रचना केली. सर्वकालीन मानवांसाठी केली गेलेली प्रार्थना म्हणजे पसायदान आहे. त्यांची रचना देखील ज्ञानेश्वर महाराजांची आहे.