Sambhaji Maharaj Punyatithi 2020 Messages: संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त शंभुराजे यांना अभिवादन करणारे मराठी HD Images आणि Whatsapp Status

शंभूराजेंच्या पुण्यतिथी निमित्त खास मराठी Messages, Whatsapp Status, Images च्या माध्यमातून शेअर करुन त्यांच्या आठवणींना उजाळा देऊया.

Sambhaji Maharaj Punya Tithi 2020 (Photo Credits: File Photo)

Chhatrapati Sambhaji Maharaj  Balidan Din 2020 Marathi Wishes: हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून ओळख असणाऱ्या संभाजी महाराज यांची 11 मार्च रोजी पुण्यतिथी. छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभे केलेले मराठा साम्राज्य संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांनी अगदी लिलया सांभाळले. आपल्या कर्तुत्वाने त्यांनी इतिहासामधील एक अदभूत व्यक्तिमत्व अशी ओळख निर्माण केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांना 14 मे इ.स. 1656 रोजी पुत्ररत्नाचा लाभ झाला. तेच हे संभाजी महाराज. त्यांना शंभुराजे असेही संबोधण्यात येते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर तब्बल 9 वर्ष स्वराज्याचा कार्यभार सांभाळला. शंभुराजे अत्यंत शूर, देखणे आणि धुरंदर राजकारणी होते. शत्रुच्या तावडीत सापडल्यानंतर अनेक हालअपेष्टा होवूनही त्यांनी आपले धैर्य, विचार सोडले नाहीत. स्वराज्यासाठी ते शत्रूपुढे झुकले नाहीत. त्यांच्या याच शौर्याने त्यांना अजरामर केले आहे.

अत्यंत शूर, पराक्रमी अशा महाराष्ट्राच्या राजाच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शंभूराजेंच्या पुण्यतिथी निमित्त खास मराठी Messages , Whatsapp Status, Images च्या माध्यमातून शेअर करुन त्यांच्या आठवणींना उजाळा देऊया.

शंभूराजे पुण्यतिथी मेसेजेस:

शिवाजी महाराज यांचे वीरपुत्र

संभाजी महाराज यांना शत् शत् नमन

पुण्यतिथीनिमित्त शंभुराजे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Sambhaji Maharaj Punya Tithi 2020 (Photo Credits: File Photo)

कोंढाण्यासाठी तानाजी गेला

घोडखिंडीसाठी समोर बाजी आला..

महाराष्ट्रधर्म वाढवण्यासाठी

स्वराज्य रक्षक संभाजी झाला...

शंभुराजे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Sambhaji Maharaj Punya Tithi 2020 (Photo Credits: File Photo)

शक्तवीर दूरदर्शी

अविस्मरणीय महारपराक्रमी

शंभुराजे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Sambhaji Maharaj Punya Tithi 2020 (Photo Credits: File Photo)

पाहुनी शौर्य तुजपुढे

मृत्यूही नतमस्तक झाला!

स्वराज्याच्या मातीसाठी

माझा शंभूराजा अमर झाला!!

शंभुराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Sambhaji Maharaj Punya Tithi 2020 (Photo Credits: File Photo)

शेर शिवा का छावा था

महापराक्रमी परमप्रतापी

एक ही शंभु राजा था..!

संभाजी महाराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Sambhaji Maharaj Punya Tithi 2020 (Photo Credits: File Photo)

छत्रपती संभाजी राजेंच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. मात्र इतक्या कठीण परिस्थितीतही हार न मानता ते मृत्यूला देखील निधड्या छातीने सामोरे गेले. जगावे कसे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले. मात्र मरावे कसे हे संभाजी महाराजांनी जनतेला दाखवून दिले.