Sambhaji Maharaj Jayanti 2020 Messages: संभाजी महाराज जयंती निमित्त मराठी Wishes, Greetings, Images, Messages शेअर करून आपल्या मित्र-मैत्रिणींना Facebook, WhatsApp च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा!
संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांचा जन्म 14 मे 1657 साली पुण्यातील पुरंदर किल्ल्यावर झाला. या थोर पुरुषाच्या जयंती निमित्त मराठी Wishes, Greetings, Images, Messages शेअर करून आपल्या मित्र-मैत्रिणींना Facebook, WhatsApp च्या माध्यमातून शुभेच्छा नक्की द्या.
Sambhaji Maharaj Jayanti 2020 Messages: छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांचे जेष्ठ पुत्र होते. लहानपणीच आईचे छत्र हरवल्याने संभाजी महाराज यांचा सांभाळ राजमाता जिजाऊ यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज यांनी 9 वर्षे राज्य केले. मुघल, सिद्धी आणि पोर्तुगीज यांसारख्या अन्य शासकांविरुद्ध लढा देत त्यांनी मराठा साम्राज्याचे रक्षण केले.
शौर्याने आणि कतृत्वाने महाराष्ट्राची शान ठरलेले संभाजी महाराज यांची उद्या जयंती आहे. संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांचा जन्म 14 मे 1657 साली पुण्यातील पुरंदर किल्ल्यावर झाला. या थोर पुरुषाच्या जयंती निमित्त मराठी Wishes, Greetings, Images, Messages शेअर करून आपल्या मित्र-मैत्रिणींना Facebook, WhatsApp च्या माध्यमातून शुभेच्छा नक्की द्या.
जागवल्याशिवाय जाग येत नाही…
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही...
तसे, "छत्रपतींचे" नाव घेतल्याशिवाय माझा दिवस
उगवत नाही…!
संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
इतिहासाच्या पानावर रयते च्या मनावर
मातीच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे राजा संभाजी छत्रपतींना मानाचा मुजरा
संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हा दिला
शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणूनी अमर जाहला
संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!
जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो आपला संभाजी होता जय संभाजी!
सिंहाची चाल, गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…
जय संभाजी जय शंभुराजे!
लहानपणापासून संभाजी महाराज चातुर्यवान होते. त्यांना अनेक भाषा ज्ञात होत्या. वेगवेगळ्या खेळात ते पटाईत होते. वयाच्या 14 व्या वर्षी संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत बुधभूषण ग्रंथ लिहिला. त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज याचे सुंदर आणि अलंकारिक भाषेत वर्णन केले आहे.