Ramadan Mubarak 2019 Wishes And Messages:सुरु झाला रमजान; WhatsApp, Facebook, SMS च्या माध्यमातून द्या मित्रांसह आप्तेष्टांना शुभेच्छा!

मोठ्या प्रेमाणे आणि आदराने अल्लाचे नामस्मरण करतात. इस्लाम धर्मात सांगितलेल्या नियमांनुसार खोटे बोलणे, दुसऱ्याची निंदा नालस्ती करणे, बदनामी करणे, स्वार्थ बाळगणे आणि खोटी शपथ घेणे यामुळे रोजा सुटतो असे मुस्लिम धर्माचे अभ्यासक आणि जाणकार सांगतात.

रमजान मुबारक, ( फाइल फोटो)

Ramzan Mubarak 2019: इस्लाम (Islam) धर्मातील अत्यंत पवित्र म्हणून ओळखला जाणार सण म्हणजे रमजान (Ramzan). रमजान काळात मुस्लिम समुदाय (Muslim Community) रोजा पाळतो. या काळात मुस्लिम बांधव प्रिय अल्लाचे मोठ्या भक्तीभावाने स्मरण करतात. 30 दिवस चालणाऱ्या या काळात केवळ अल्लाचे स्मरणच केले जात नाही तर, मनातील विचार, विकार आणि कुकृत्यावरही मोठ्या कटाक्षाने मर्यादा घालून त्या काबूत ठेवल्या जातात. रमजानचा काळ म्हणजे धर्मशास्त्राने सांगितल्या प्रमाणे अल्याच्या वाटेने चालण्याचा काळ, अशी भावना हा उत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात असते. या काळात मुस्लिम बांधव आणि सर्व धर्मिय बांधव एकमेकांना शुभेच्छा देतात. विद्यमान काळापेक्षाही चांगले भविष्य लाभण्यासाठी सदिच्छा व्यक्त करतात.

असेही सांगितले जाते की, रमजानच्या काळात अल्ला आपल्या उपासकांसाठी जन्नतचे दरवाजे उघडतो. आपल्या हातून वर्षभर किंवा त्याही आगोदरच्या काळापासून घडलेल्या सर्व वाईट घटना, कृत्य आदी गोष्टींची माफी मागितली जाते. अशा या पवित्र काळात एकमेकांना शुभेच्छा देण्यासही सुरुवात झाली आहे. आजकालची टेक्नोसोव्ही पीढी WhatsApp Stickers, SMS और Facebook Greetings च्या माध्यमातून शुभेच्छा देते. अर्थात यात केवळ तरुणच नव्हे तर बुजुर्ग मंडळीही सहभागी असतात. अशा सर्व वर्गासाठी WhatsApp Stickers, SMS आणि Facebook Greetings तुम्ही इथे पाहू शकता. (हेही वाचा, Ramzan Chand 2019: राजधानी मुंबईत चंद्रदर्शन रमजान उत्सवाला शहरभर सुरुवात)

(Photo Credits: File Image)

मुबारक हो आपको खुदा की दी यह जिंदगी,

खुशियों से भरी रहे आपकी यह जिंदगी,

गम का साया कभी आप पर न आए,

दुआ है यह हमारी आप सदा यूं ही मुस्कुराएं,

रमजान मुबारक !

 

(Photo Credits: File Image)

खुशियां नसीब हो, जन्नत करीब हो,

तू चाहे जिसे वो तेरे करीब हो,

कुछ इस तरह हो करम अल्लाह का,

मक्का और मदीना की तुझे ज़ियारत नसीब हो.

रमजान मुबारक !

(Photo Credits: File Image)

रमजान आया है, रमजान आया है,

रहमतों का, बरकतों का महीना आया है,

लूट लो नेकियां जितना लूट सकते हो,

पूरे एक साल में ये ऑफर का महीना आया है.

रमजान मुबारक !

(Photo Credits: File Image)

ऐ माह-ए-रमजान आहिस्ता चल,

अभी काफी कर्ज चुकाना है,

अल्लाह को करना है राजी और गुनाहों को मिटाना है,

ख्वाबों को लिखना है और रब को मनाना है.

रमजान मुबारक !

(Photo Credits: File Image)आसमान पे नया चांद है आया,

सारा आलम खुशी से जगमगाया,

हो रही है सहर-ओ-इफ्तार की तैयारी,

सज रही हैं दुआओं की सवारी,

पूरे हो आपके दिल के हर अरमान,

मुबारक हो आप सब को प्यारा रमजान.

रमजान मुबारक !

रमजानचा हा उत्सव पुढील 30 दिवस चालणार आहे.या काळात मुस्लिम बांधव वाईट गोष्टी आणि कृत्यांपासून कटाक्षाने दूर राहतात. मोठ्या प्रेमाणे आणि आदराने अल्लाचे नामस्मरण करतात. इस्लाम धर्मात सांगितलेल्या नियमांनुसार खोटे बोलणे, दुसऱ्याची निंदा नालस्ती करणे, बदनामी करणे, स्वार्थ बाळगणे आणि खोटी शपथ घेणे यामुळे रोजा सुटतो असे मुस्लिम धर्माचे अभ्यासक आणि जाणकार सांगतात.