Ram Navami 2019: रामनवमी का साजरी करतात?

या दिवशी दुपारी 12 वाजता श्रीरामाचा जन्म झाला.

Ram Navami Significance & Celebrations (Photo Credits: Facebook)

Significance and Importance of Rama Navami: चैत्र महिन्यातील शुल्क पक्षातील नवमीला रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी दुपारी 12 वाजता भगवान श्रीरामाचा जन्म झाला. त्यामुळे या तिथीला देशभरातील विविध मंदिरात रामजन्मोत्सव साजरा केला जातो. रामाची मुर्ती किंवा फोटो यांची साग्रसंगीत पूजा केली जाते. दुपारी 12 वाजता श्रीरामाची मुर्ती पाळण्यात ठेवून पाळणा गायला जातो. यानिमित्ताने भजन-कीर्तनाचे आयोजन केले जाते. तर काहीजण रामनवमी निमित्त उपवासही ठेवतात. यंदा 13 एप्रिलला साजरी होणार राम नवमी; पहा नक्षत्र, तिथीची शुभ वेळ काय?

पृथ्वीवर पाप वाढले, दृष्ट शक्ती लोकांना त्रास देऊ लागल्या की श्रीविष्णू अवतार घेतात, असे मानले जाते. अशावेळी भगवान विष्णुने घेतलेला सातवा अवतार म्हणजे श्रीराम होय. लंकेचा राजा रावण याने श्रीशंकराकडून वर मिळवला आणि त्यामुळे गर्विष्ठ होऊन सर्वांना त्रास देऊ लागला. अशा या रावणाचा घात करण्यासाठी खुद्द भगवान विष्णू श्रीरामाच्या रुपात अवतरले. शिर्डीमध्ये 12 ते 14 एप्रिल दरम्यान रंगणार श्रीरामनवमी उत्‍सव; पहा कसा असेल संपूर्ण कार्यक्रम

श्रीराम हे आदर्श पुरुष होते. त्यांना 'मर्यादापुरुषोत्तम' असेही म्हणतात. एकनिष्ठ, एकवचनी, एकपत्नी हे रामाचे गुण सर्वश्रूत आहेत. त्याचबरोबर राम मातृ-पितृ भक्त होते. बंधुप्रेम, सत्यवचनी, प्रजाप्रेम हे अतिशय श्रेष्ठ गुणही त्यांच्या अंगी होते. त्यांच्या राज्यात प्रजा अतिशय सुखी आणि समाधानी होती. म्हणूनच आदर्श राज्याला 'रामराज्य' असेही म्हटले जाते.

श्रीरामाच्या श्रेष्ठ गुणांमुळे आणि कार्यामुळेच आपण सारे उत्साहाने, भक्तीभावाने रामनवमीचा उत्सव साजरा करतो.