Raksha Bandhan 2024 Messages for Brother In Marathi: रक्षाबंधन निमित्त Wishes, Images, Quotes, WhatsApp Status द्वारे द्या लाडक्या भावाला खास शुभेच्छा!

तुम्ही हे मेसेज डाऊनलोड करून आपल्या लाडक्या भावाला किंवा बहिणीला पाठवू शकता.

Raksha Bandhan 2024 Messages 7 (Photo Credit - File Image)

Raksha Bandhan 2024 Messages for Brother In Marathi: श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा हा रक्षाबंधन (Raksha Bandhan 2024) सण म्हणून साजरा केला जातो. यंदा पौर्णिमा सोमवार, 19 ऑगस्ट रोजी आहे. त्यामुळे याच दिवशी म्हणजे 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधन हे भाऊ-बहिणीतील प्रेमाचे प्रतीक आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाचे औक्षण करून त्याला राखी बांधते. तसेच भाऊ आपल्या बहिणीला तिच्या रक्षणासाठी वचन देतो. रक्षाबंधनाचा सण भाऊ-बहिणींच्या नात्याला अधिक दृढ बनवतो. (हेही वाचा -Narali Purnima 2024 Date and Significance: नारळी पौर्णिमेची तारीख, पूजा विधी आणि महत्व, जाणून घ्या, संपूर्ण माहिती)

या दिवशी भाऊ-बहिण सोशल मीडियावर काही खास संदेश पोस्ट करून एकमेकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतात. तुम्हालाही रक्षाबंधनानिमित्त आपल्या भाऊ किंवा बहिणीला शुभेच्छा द्यायच्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी खाली रक्षाबंधन कोट्स, रक्षाबंधन स्टेटस, रक्षाबंधन मराठी मेसेज दिले आहेत. तुम्ही हे मेसेज डाऊनलोड करून आपल्या लाडक्या भावाला किंवा बहिणीला पाठवू शकता. (हेही वाचा - Raksha Bandhan 2024 Quotes In Marathi: रक्षाबंधनच्या WhatsApp Wishes, GIF Greetings आणि Quotes च्या माध्यमातून लाडक्या बहिणीला द्या खास शुभेच्छा)

तू बांधलेली राखी मी जीवापेक्षा जास्त जपतो,

कारण जेव्हा तू जवळ नसते.

त्यावेळी तुझ्या प्रेमाची

ती मला सतत आठवण करुन देते.

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

लहानपणी तुझ्या कितीतरी चुकांचा

फटका मी खाल्ला आहे...

कारण तुझ्या रक्षणाचा विडा जो उचलला आहे

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

ताई तू माझी..

लहान भाऊ मी तुझा..

कायम तूच केलीस माझी रक्षा..

आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भाऊ तू माझा,

तुझ्याशिवाय काही सुचत नाही,

बहिणीची वेडी माया काही केल्या कमी होत नाही...

रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

आई- बहीण- मुलगी सगळी रुप आहेत

तुझ्यात सामावले आहे माझे विश्व

आणि तुझ्यावरच माझा सगळा विश्वास

हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे,

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई!!

बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,

बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती..

औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती..

रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती..

बंधन असूनही, बंधन हे थोडेच,

या तर हळव्या रेशीमगाठी

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा

यंदा रक्षाबंधनाचा सण भाद्रच्या प्रभावाखाली असणार आहे. भाद्र असताना राखी बांधणे अशुभ मानले जाते. रक्षाबंधन सणाच्या दिवशी सोमवारी पहाटे 5.53 वाजल्यापासून भाद्र सुरू होईल. दुपारी 1:32 पर्यंत भाद्र राहील. अशा परिस्थितीत दुपारी 1.33 वाजल्यापासून राखीचा सण साजरा होणार आहे. शास्त्रानुसार भाद्र काळात राखी बांधणे निषिद्ध मानले जाते. भाद्र काळात कोणतेही शुभ कार्य, सण, भावाच्या मनगटावर राखी बांधू नये.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif