Rabindranath Tagore Jayanti 2022 Wishes: रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी, खास मराठी HD Greetings, Wallpapers, Whatsapp Status च्या माध्यमातून शेअर करा त्यांचे सुंदर विचार

रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंती निमित्त तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींना WhatsApp फोटो, प्रतिमा, HD वॉलपेपर आणि एसएमएस पाठवून शुभेच्छा द्या

रवींद्रनाथ टागोर यांची जयंती यंदा 7 मे रोजी शनिवारी आहे. रवींद्रनाथ टागोर हे एक महान बंगाली कवी, लेखक, चित्रकार, संगीतकार आणि तत्त्वज्ञ होते. त्यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी झाला होता. बंगाली कॅलेंडरनुसार, टागोर जयंती बैशाख महिन्याच्या २५ व्या दिवशी येते. आम्ही तयार केलेले टागोर जयंतीचे  WhatsApp संदेश, चित्रे, HD वॉलपेपर आणि कोट्स तुम्ही सर्वांना पाठवू शकता. पश्चिम बंगालमध्ये लोक रवींद्रनाथ टागोर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात. रवींद्रनाथ टागोरांच्या कार्यावर आधारित लेखन आणि कविता स्पर्धा, नृत्य आणि नाटक इत्यादीचे कार्यक्रमात सादरीकरण करतात. अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी अनेक ठिकाणी टागोरांनी लिहिलेली गाणी आणि कवितांचे पठण केले जाते. असे महान रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंती निमित्त तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींना WhatsApp फोटो, प्रतिमा, HD वॉलपेपर आणि एसएमएस पाठवून शुभेच्छा द्या.

‘गीतांजली’ला मिळालेल्या नोबेल पारितोषिकामुळे ते ‘विश्ववंद्य कवी’ ठरले, तर त्यांच्या ‘जन गण मन’ला राष्ट्रगीताचा मान मिळाल्याने ते राष्ट्रकवी झाले. रवींद्रनाथांनी रचलेल्या व चाल दिलेल्या जवळपास 2230 गीतांना एकत्रितपणे रवींद्रसंगीत असे संबोधले जाते. त्यावेळी भारतामध्ये सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक चळवळींचे प्रमुख केन्द्रांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राचा प्रभाव रवींद्रनाथांवरही पडला होता. संत तुकारामांच्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केला होता. संत तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत. 13 नोव्हेंबर, 1913 रोजी त्यांच्या गीतांजलि या काव्यसंग्रहाला स्वीडिश अकॅडेमीने नोबेल पारितोषिक दिल्याची वार्ता कळली. साहित्यासाठी हे पारितोषिक मिळवलेले रवींद्रनाथ पहिले आशियाई लेखक होत.