Mahaparinirvan Din Quotes: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त Wishes, Greetings, Messages, WhatsApp Status द्वारे अर्पण करा आदरांजली!

त्यांच्या पुण्यतिथी निमित्त तुम्ही Wishes, Greetings, Messages, WhatsApp Status द्वारे बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी खालील संदेश मोफत डाऊनलोड करू शकता.

Mahaparinirvan Din Quotes 6 (फोटो सौजन्य - File Image)

Mahaparinirvan Din Quotes: भारतात दरवर्षी 6 डिसेंबर हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला महापरिनिर्वाण दिवस असेही म्हणतात. अस्पृश्यता, दलितांचे उत्थान, महिला आणि मजुरांवरील भेदभाव यांसारख्या समाजात प्रचलित असलेल्या दुष्प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवणारे बाबासाहेब हे भारतीय राज्यघटनेचे आधारस्तंभ मानले जातात. बाबासाहेबांना संविधानाच्या माध्यमातून हा देश समता, सद्भावना आणि बंधुतेच्या भावनेने रुजवायचा होता. परदेशात जाऊन अर्थशास्त्राची पदवी मिळवणारे डॉ. आंबेडकर हे पहिले भारतीय आहेत. आंबेडकर परदेशातून पदवी घेऊन भारतात आले तेव्हा 1926 साली ते पहिल्यांदा मुंबई विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.

डॉ. आंबेडकर हे थोर समाजसुधारक आणि विद्वान होते असे त्यांचे अनुयायी मानतात. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलितांच्या उन्नतीसाठी समर्पित केले होते. त्यांचे अनुयायी असे मानतात की, त्यांचे गुरू भगवान बुद्धांसारखे अत्यंत सद्गुणी होते. डॉ. आंबेडकरांना त्यांच्या महान कार्यामुळे आणि सदाचारी जीवनामुळे निर्वाण मिळाले आहे. त्यामुळेच त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त तुम्ही Wishes, Greetings, Messages, WhatsApp Status द्वारे बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी खालील संदेश मोफत डाऊनलोड करू शकता.

दलितांचे ते तलवार होऊन गेले,

अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले,

होते ते एक गरीबच,

पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले..

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम!!!

Mahaparinirvan Din Quotes 1 (फोटो सौजन्य - File Image)

नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला,

नमन त्या ज्ञानदेवतेला, नमन त्या महापुरुषाला,

नमन अशा आपल्या बाबासाहेबांना..!

ज्ञान सूर्य महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

Mahaparinirvan Din Quotes 2 (फोटो सौजन्य - File Image)

विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूत्र,

क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार,

उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य,

बोधीसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

महापरिनिर्वाण दिनानिमित्त..

त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन…

कोटी कोटी प्रणाम…!

Mahaparinirvan Din Quotes 3 (फोटो सौजन्य - File Image)

महा मानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे

शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धारकर्ते

भारताचे भाग्य विधाते

परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर

यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त

त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…

कोटी कोटी प्रणाम!!!

Mahaparinirvan Din Quotes 4 (फोटो सौजन्य - File Image)

लोकांनी सत्याच्या मार्गावर चालावे यासाठी बनले ते मार्गदर्शक

वेळप्रसंगी योग्य वाट दाखविण्यासाठी बनले त्यांचे दिशादर्शक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!

Mahaparinirvan Din Quotes 5 (फोटो सौजन्य - File Image)

बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या काळातील सर्वात शिक्षित महान विद्वानांपैकी एक होते. त्याच्याकडे 32 वेगवेगळ्या डिग्री होत्या. त्यांनी परदेशात जाऊन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एमएससी, डीएससी केले होते. आजही देशभरातचं नव्हे तर जगभरात बाबासाहेबांचे कार्य नावाजले जाते.