Pandharpur Wari 2020: देहू मधून आज संत तुकाराम महाराज तर पैठण मधून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; कोरोनामुळे पायी वारी रद्द
दरम्यान यंदा कोरोना संकटामुळे मोजक्याच वारकर्यांना त्यामध्ये सहभागी होणार आहे.
Sant Tukaram Palkhi Prasthan 2020: जून महिना उजाडला की पावसाची आणि वारकर्यांना आषाढी वारीचे वेध लागतात. आजपासून यंदाच्या आषाढी एकादशी पंढरपूर वारी सोहळ्याला सुरूवात झाली आहे. आज संत तुकाराम महाराजांची पालखी (Sant Tukaram Palkhi) देहू (Dehu) मधून प्रस्थान ठेवणार आहे. दरम्यान यंदा आषाढी वारी 2020 (Ashadhi Wari) वर कोरोना व्हायरसचं (Coronavirus) सावट असल्याने अवघ्या 50 लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा सुरू होणार आहे. परंपरेनुसार यावर्षी वैष्णवांच्या मेळाव्यात पालखी निघणार नाही. कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे मंदिराला प्रदक्षिणा घालत पालखी मंदिरामध्येच राहणार आहे. तर दशमीला पादुका रवाना केल्या जाणार आहेत. उद्या (13 जून) दिवशी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या प्रस्थान (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Prasthan) होणार आहे. मात्र ते देखील मर्यादित स्वरूपातच असेल.
आज औरंगाबादमधून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे देखील प्रस्थान होणार आहे. पैठण मध्ये अवघ्या 20 जणांना या सोहळ्यात सहभागी होता होणार आहे. आज पैठण मध्ये 12 च्या सुमारास दिंडी सोहळा सुरू होईल. वारकरी तल्लीन होत दरवर्षी पायी वारीला सुरूवात होत असे. मात्र यंदा सारीकडे सुन्न वातावरण आहे. दरम्यान ही पालखी मंदिरामध्येच राहणार आहे. नाथवाड्यामध्ये हा सोहळा संपन्न होईल.
देहुत प्रस्थान सोहळ्याचे कीर्तन सुरू !
महाराष्ट्रात सुमारे 300-400 वर्षांपेक्षा जुनी आषाढी एकादशी निमित्त पायी वारी निघते. मात्र यंदा या भव्य सोहळ्यामध्ये खंड पडला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकार सोबत झालेल्या चर्चेमध्ये सुवर्ण मध्य काढत वारकर्यांनी कोरोना व्हायरसचं जागतिक संकट पाहता पायी दिंडी सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये बदल केले आहेत. सोशल डिस्टन्सिंग, मास्क परिधान करत यंदा पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे. दरम्यान 1 जुलै दिवशी आषाढी एकादशी असल्याने 30 जून पर्यंत पालखी मंदिरामध्येच राहील. तर सरकारच्या पुढील आदेशाप्रमाणे दशमीला पंढरपुरला पादुका घेऊन जाऊन त्याचं पूजन केलं जाणार आहे.