Happy Sister Day 2023 Messages: 'सिस्टर्स डे' निमित्त Whats App Status, Greetings, Quotes द्वारे लाडक्या बहिणीला द्या खास शुभेच्छा!

यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.

Sister Day 2023 Messages (PC - File Image)

Happy Sister Day 2023 Messages: दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी सिस्टर्स डे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या वर्षी 6 ऑगस्ट रोजी सिस्टर्स डे साजरा करण्यात येत आहे. भारतात बहिणींना समर्पित केलेले दोन सण मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात, यातील एक म्हणजे भाऊबीज आणि दुसरा म्हणजे रक्षाबंधन. या ऑगस्टच्या पहिल्या रविवारी म्हणजेच 6 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय भगिनी दिन साजरा केला जातो. या दिवशी देशभरात बहिणींबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त केला जातो. खरे तर बहीण ही अशी व्यक्ती आहे जी आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या पाठीशी उभी असते. ती आपल्याला रस्ता दाखवतो, पाठीवर थाप देते. जेव्हा आपण द्विधा अवस्थेत असतो तेव्हा ती काय करावे किंवा काय करू नये, यासंदर्भात मार्गदर्शक करत असते.

बहिणीशी आपलं रक्ताचं नातं असतं. पण त्याहीपेक्षा ते भावनांचं नातं असतं, जे आपल्याला प्रत्येक क्षणाला एकमेकांशी जोडून ठेवतं. दोन बहिणींमध्ये शूज, चप्पल, ड्रेस, पुस्तके, फॅन्सी घड्याळ, मेकअप किट आणि खाण्यापिण्यासारख्या गोष्टींवरून भांडण होते, परंतु काही काळानंतर सर्वकाही सामान्य होतं, हे या नात्याचे गुण आहेत. 'सिस्टर्स डे' निमित्त Whats App Status, Greetings, Quotes द्वारे तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींना या खास दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक

सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या

माझ्या प्रिय दिदीला

Happy Sisters Day!

Sister Day 2023 Messages (PC - File Image)

ताई शब्दातचं आहे माया प्रेमळ आईची.

जन्मोजन्मी मज राहो साथ माझ्या ह्या ताईची.

Happy Sisters Day!

Sister Day 2023 Messages (PC - File Image)

तू माझी बहीण

मी तुझा भाऊ

प्रेमाचं आपलं नातं

आयुष्यभर अतूट ठेवू

Happy Sisters Day!

Sister Day 2023 Messages (PC - File Image)

सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण

सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण

फक्त आंनदच सर्वकाही नसतो

मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण..

Happy Sisters Day!

Sister Day 2023 Messages (PC - File Image)

बहिण भावाच नातं हे असचं असत,

ज्याला वयाच बंधन नसतं,

कितीही भांडले तरी अडचणीत,

एकमेकांसाठी धावून येतातचं….

Happy Sisters Day!

Sister Day 2023 Messages (PC - File Image)

भारतात सर्वंच स्त्रीयांचा आदर केला जातो. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या रविवारी सिस्टर्स डे साजरा करण्याची संधी मिळत असेल, तर तो खास बनवण्याची संधी तुम्ही सोडू नका. जर तुमची बहीण तुमच्यासोबत राहिली तर हा दिवस संस्मरणीय आणि मजेदार बनवण्यासाठी काहीतरी प्लानिंग करा. कुठेतरी सहलीला जा, तुमच्या बहिणीला चित्रपट पाहायला घेऊन जा, तुमच्या बहिणीला कौटुंबिक हॉटेलमध्ये सरप्राईज पार्टीसाठी आमंत्रित करा. तिला खास सरप्राईज गिफ्ट द्या आणि जर बहीण तुमच्यापासून दूर असेल तर तुम्ही तिच्यासाठी अविस्मरणीय भेटवस्तू, चॉकलेट, ड्रायफ्रूट, मिठाई, कपडे इत्यादी ऑनलाइन भेट देऊ शकता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif