Rajmata Jijau Punyatithi 2025 Messages: तिथीनुसार साजरा होणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त WhatsApp Status, Wishes, Quotes द्वारे त्यांच्या स्मृतीस करा त्रिवार वंदन!

तिथीनुसार साजरा होणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त WhatsApp Status, Wishes, Quotes द्वारे तुम्ही त्यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन करू शकता. यासाठी तुम्ही खालील फोटोज मोफत डाऊनलोड करू शकता.

Rajmata Jijau Punyatithi 2025 Messages: तिथीनुसार साजरा होणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त WhatsApp Status, Wishes, Quotes द्वारे त्यांच्या स्मृतीस करा त्रिवार वंदन!
Rajmata Jijau Punyatithi 2025 Messages (Photo Credit - File Image)

Rajmata Jijau Punyatithi 2025 Messages: छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचा धडा गिरवणाऱ्या राजमाता जिजाबाईंचा (Rajmata Jijau) जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव होते, जे सिंदखेड गावचे राजे होते. लखुजी बालपणी जिजाबाईंनना जिजाऊ म्हणत असतं. जिजाबाई फक्त 6 वर्षांच्या असताना, त्यांचे लग्न मोलाजींचे पुत्र शहाजी भोसले यांच्याशी झाले. राष्ट्र आणि धर्माप्रती भक्तीचे बीज पेरून जिजाऊंनी शिवाजी महाराजांना एक आदर्श शासक बनवले.

राजमाता जिजाऊ केवळ शिवरायांच्या आई नव्हत्या तर त्या प्रत्येक मावळ्यासाठी प्रेरणेचा स्रोत होत्या. आपल्या प्रयत्नांना केवळ देवाच्या कृपेनेच यश मिळते असा त्यांचा दृढ विश्वास होता. तारखेनुसार, जिजाऊंची पुण्यतिथी (Rajmata Jijau Punyatithi 2025) 17 जून रोजी साजरी केली जाते. तथापी, यंदा 20 जून रोजी राजमाता जिजाऊंची तिथीनुसार पुण्यतिथी साजरी होणार आहे. तिथीनुसार साजरा होणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त WhatsApp Status, Wishes, Quotes द्वारे तुम्ही त्यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन करू शकता. यासाठी तुम्ही खालील फोटोज मोफत डाऊनलोड करू शकता.

जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसते राहिले शिवबा अन शंभू छावा.

जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा!

राजमाता जिजाऊंच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

Rajmata Jijau Punyatithi 2025 Messages 1 (Photo Credit - File Image)

चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे न मिटणार…

थोर तुमचे कर्म जिजाऊसाहेब

उपकार कधी ना फिटणार…

राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब

यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!!

Rajmata Jijau Punyatithi 2025 Messages 2 (Photo Credit - File Image)

मुजरा त्या मातेला,

जिने घडविला राजा रयतेचा

वसा स्वराज्याचा चालविला...

राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना

पुण्यतिथीनिमित्त त्रिवार अभिवादन!

Rajmata Jijau Punyatithi 2025 Messages 3 (Photo Credit - File Image)

महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून

ज्या माऊलीने, गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला,

त्या थोर ‘राजमाता जिजाऊला’ मानाचा मुजरा!

राजमाता जिजाऊ माँ साहेब

यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!!

Rajmata Jijau Punyatithi 2025 Messages 4 (Photo Credit - File Image)

मुजरा माझा माता जिजाऊंना,

जिने घडविले शुर शिवबाला.

साक्षात होती ती आई भवानी,

जिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी!

राजमाता जिजाऊंच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

Rajmata Jijau Punyatithi 2025 Messages 5 (Photo Credit - File Image)

राजमाता जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. जिजाबाईंना एकूण सहा अपत्ये होती. त्यापैकी 4 दगावली. जिजाऊंचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. तथापि, शिवरायांना स्वराज्याचे स्पप्न दाखवणाऱ्या जिजाऊंचा मृत्यू 17 जून 1674 रोजी झाला.

(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2025 11:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).