Marathwada Mukti Sangram Din 2022 HD Images: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त WhatsApp Status, Messages, Quotes द्वारा मराठवाडा मुक्तीसाठी शहीद झालेल्या हुतात्म्यांना करा विनम्र अभिवादन!
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त WhatsApp Status, Messages, Quotes द्वारा मराठवाडा मुक्तीसाठी शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन नक्की करा. यासाठी तुम्हाला खालील ईमेज डाऊनलोड करता येतील.
Marathwada Mukti Sangram Din 2022 HD Images: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा महाराष्ट्र राज्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जातो. 1948 मध्ये या दिवशी मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपुष्टात आली आणि मराठवाडा भारताचा भाग बनला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. मात्र, त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या 565 पैकी 562 संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद संस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि जुनागड संस्थान ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती.हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान यांचे राज्य होते.
हैदराबाद संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून निझाम वंशाचे राज्य होते. त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरू झाला होता. अखेर 17 सप्टेंबर रोजी मराठवाड्याला निजामापासून स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे हा दिवस मराठवड्यातील जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त WhatsApp Status, Messages, Quotes द्वारा मराठवाडा मुक्तीसाठी शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन नक्की करा. यासाठी तुम्हाला खालील ईमेज डाऊनलोड करता येतील. (हेही वाचा - Marathwada Liberation Day 2022: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कधी आहे? हा दिवस साजरा करण्यामागे काय आहे इतिहास? स्वातंत्र्यानंतर मराठवाड्यातील जनतेला 13 महिने स्वातंत्र्यासाठी लढा का द्यावा लागला? जाणून घ्या)
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा!
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मुक्ती संग्राम लढ्यातील सर्व हुतात्मांना
विनम्र अभिवादन!
मराठवाडा मुक्तीसाठी शहीद झालेल्या
सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा!
मराठवाडा मुक्तीसंग्रामातील शुरविरांना
विनम्र अभिवादन!
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा!
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे आदी नेत्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामासाठी लढा दिला. मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले.
(The above story first appeared on LatestLY on Sep 17, 2022 07:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

